घरमनोरंजन'मेडल जिंकल्याने मीराबाई भारतीय, अन्यथा चिंकी, चाईनीज, कोरोना म्हटले असते,'...

‘मेडल जिंकल्याने मीराबाई भारतीय, अन्यथा चिंकी, चाईनीज, कोरोना म्हटले असते,’…

Subscribe

टोकियो ऑलिम्पिक २०२० च्या पहिल्याच दिवस भारतीय वेटलिफ्टर मीराबाई चानू यांनी रौप्यपदक जिंकत आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा झेंडा अभिमानाने फडकवला आहे. ईशान्य भारतातील मणिपूर राज्यात लहानच्या मोठ्या झालेल्या वेटलिफ्टर मीराबाई चानू यांचे नाव आज देशात अभिमानाने घेतले जात आहे. इतिहास निर्माण केल्याबद्दल संपूर्ण देश मीराबाई चानू यांचे अभिनंदन करीत आहे. परंतु अनेक आंतरराष्ट्रीय पदकांवर नाव कोरणाऱ्या ईशान्य भारतीय लोकांवर त्यांच्या दिसण्यावरून होणाऱ्या टीका, टिप्पण्यांना दुर्लक्ष करता येणे शक्य नाही. ईशान्य भारतात बालपण घालवणारी अभिनेता मिलिंद सोमण याची पत्नी अंकिता कोंवर हिने याच मुद्द्यावरून आज आवाज उठवला आहे.

अंकिता कोंवरने तिच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये ईशान्य भारतातील लोकांच्या दिसण्यावरून होणाऱ्या भेदभावासंदर्भात संताप व्यक्त केला आहे. अंकिताने तिच्या पोस्टमध्ये लिहिले की, “जर तुम्ही ईशान्य भारतीय असाल तर देशासाठी तुम्ही पदक जिंकल्यासच तुम्हाला भारतीय म्हणता येईल. अन्यथा आम्ही लोकं चिंकी, चाइनीज, नेपाळी आणि एक नवे कोरोना या नावाने ओळखले जातो.” अंकिता पुढे सांगते, “भारतात केवळ जातीवादच नाही तर वर्णभेदही केला जातो.  मी माझ्या अनुभवातून सांगत आहे.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Ankita Konwar (@ankita_earthy)

- Advertisement -

गुवाहाटी येथील रहिवासी असलेल्या अंकिताशिवाय मेरी कॉम चित्रपटातील सहकलाकार एक्सोन हीनेही याविषयी आपले मत व्यक्त केले होते. मणिपूरमधील अभिनेत्री लिन लॅशरामने यापूर्वी ईशान्य भारतीयांना त्यांच्या दिसण्यावरून होणाऱ्या भेदभावासंदर्भात भाष्य केलं आहे. लिन यावर म्हणाली होती की, मेरी कॉम चित्रपटासाठी प्रियंका चोप्राने अधिक मेहनत घेतली. परंतु या भूमिकेसाठी ईशान्य भारतातील मुलीला का घेण्यात आले नाही? जेव्हा ईशान्य भारतातील लोकांची भूमिका निभावण्याची वेळ येते तेव्हा ईशान्य भारतातील व्यक्तीचीच निवड केली जाते.

- Advertisement -

Maharashtra Floods : काँग्रेस नगरसेवकांचेही पुरग्रस्तांसाठी एक महिन्याचे मानधन


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -