Wednesday, February 17, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन जया बच्चन यांची पुन्हा मराठी सिनेमात एंट्री

जया बच्चन यांची पुन्हा मराठी सिनेमात एंट्री

Related Story

- Advertisement -

हिंदी सिनेसृष्टीत आपले वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्री जया बच्चन मराठी सिनेसृष्टीत पुन्हा एकदा पाऊल ठेवणार आहेत. जया बच्चन गजेंद्र अहिरे दिग्दर्शित एका मराठी सिनेमात झळकणार आहेत. अद्याप या सिनेमाचे नाव गुलदस्त्यात आहे. विशेष म्हणजे जया बच्चन यांनी या अगोदर अमिताभ बच्चन यांचे दीर्घकालीन मेकअपमॅन दीपक सावंत यांनी निर्मित केलेल्या ‘अक्का’ या मराठी सिनेमात झळकल्या होत्या. या मराठी सिनेमातील ‘तू जगती अधिपती नमन तुला पहिले श्री गणगती’ या गाण्यात बिग बींसोबत भूमिका केली होती. तसेच या चित्रपटाच्या गाण्याचे ऑडिओ रिलीज सोहळा जया बच्चन यांच्या शुभ हस्ते जुहूच्या एका पंचतारंकित हॉटेलमध्ये झाले. जया बच्चन यांनी बॉलिवूडमधील अनेक ब्लॉक बस्टर सिनेमांतून काम केले आहे. परंतु ७ वर्ष त्यांनी सिनेमांतून ब्रेक घेतला होता. मात्र बॉलिवूडमधील अनेक पार्टी, अवॉर्ड सोहळ्यात बिग बींसोबत दिसतात.

परंतु आता ७ वर्षाच्या ब्रेकनंतर जया बच्चन पुन्हा अभिनय करण्यास सज्ज झाल्या आहेत. परंतु आता एक मराठी भूमिकेतून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. (Jaya Bachchan) त्यामुळे गजेंद्र अहिरे दिग्दर्शित या आगमी सिनेमातील जया बच्चन यांचा अभिनय पाहण्यासाठी सारेच उत्सुक आहेत. जेंद्र यांनी आत्तापर्यंत शेवरी, अनुमतीसारख्या ५० पेक्षा अधिक चित्रपटांसाठी काम केले आहे. जया बच्चन यांनी १९७३ मध्ये अमिताभ बच्चन यांच्यासोबत लग्न केल्यानंतर बॉलिवूडपासून दूर राहणे पसंत केले. त्यानंतर मात्र सिलसिला, कभी खुशी कभी गम, लागा चुनरी में दाग, कल हो हो, जैसी चुनिंदा अशा सलग सिनेमांमध्ये दिसल्या. २०१२ मध्ये शेवटच्या ‘सनग्लास’ या सिनेमात त्या नसीरुद्दीन शाहांसोबत झळकल्या. परंतु हा सिनेमा प्रदर्शित झाला नाही.

- Advertisement -

अभिनयासोबतच जया बच्चन यांनी राजकारणातही एंट्री घेतली. परखड भाषण शैलीने त्यांनी राजकारणात आपले स्थान मजबूत केले. अनेक राजकीय घटनांवर त्या आपले परखड मत व्यक्त करतात.  सोशल मिडियावरही बऱ्याच सक्रिय असतात. नुकताच जया बच्चन यांच्या लेक श्वेता बच्चन नंदासोबत डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ सोशल मिडियावरही तुफान हिट ठरला.

 

- Advertisement -