Kajol अन् Nyasa Devgn ट्रोलिंगची शिकार, माय-लेकीच्या फोटोंवर अशा कॉमेंट्स

Bollywood kajol devgn and nyasa devgn trolled on same day for different reasons fan and color shamed
Kajol अन् Nyasa Devgn ट्रोलिंगची शिकार, माय-लेकीच्या फोटोंवर अशा कॉमेंट्स

बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आणि काजोलची मुलगी न्यासा देवगनच्या बॉलिवूड डेब्यूबाबत चाहत्यांकडून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान न्यासाला तिच्या रंगावरून सोशल मीडियावर यापूर्वी बरचं ट्रोल करण्यात आले, मात्र अलीकडे न्यासासोबत आता आई काजोललाही फिटनेसवरून सोशल मीडियावर ट्रोल केले जातेय. नुकतेच काजोलला पिलाटे क्लासबाहेर स्पॉट करण्यात आले.

काजोल फॅट शेमिंगची शिकार

काजोलने अलीकडेच पापाराझींसाठी पोज देताना दिसली, यावेळचे तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल फोटोंवर यूजर्सकडूनही तिला फॅट शेमिंगचा शिकार बनवले जात आहे. एका यूजरने कमेंट करत लिहिले की – हा बिअर आला कुठून? दुसर्‍या एका यूजरने लिहिले की, हे लोक चित्रपटात इतके फिट दिसतात पण रिअल लाईफमध्ये काही तरी वेगळेच असतात. तिसऱ्या एका युजर्सने कमेंट्सम करत लिहिले की, काजोल काय आहे हे तुझे वजन का वाढत आहे?

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

दरम्यान त्याच दिवशी कालोजची मुलगी न्यासा देवगनलाही सोशल मीडिया युजर्सनी ट्रोल केले होते. काजोलला तिच्या शरीरयष्टीसाठी ट्रोल करण्यात आलं होतं, तर न्यासाला नेहमीप्रमाणे तिच्या रंग आणि फिजिकल फिटनेससाठी ट्रोल करण्यात आलं. न्यासाच्या फोटोंवर एका यूजरने लिहिले की, ‘माझ्या तोंडात विमल असल्यामुळे तू मास्क घातला आहेस का?’ तर दुसऱ्या एका युजरने लिहिले की, तिने रंगावर खूप खर्च केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

चाहत्यांना न्यासाच्या बॉलिवूड डेब्यूची प्रतिक्षा

एकीकडे अजय देवगण आणि काजोल हळूहळू पडद्यामागे काम करण्यावर लक्ष केंद्रित करत आहेत, तर दुसरीकडे, चाहते अजय-काजोलची मुलगी न्यासाच्या बॉलिवूड डेब्यूबद्दल खूप उत्सुक आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून न्यासाला दररोज तिच्या रंग आणि फिजीकल फिटनेसवरून ट्रोल केले जातेय. अशा परिस्थितीत त्याच्या पहिल्या बॉलिवूड डेब्यूला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.


तीन वर्षानंतर Sonu Sood बॉलिवूडमध्ये ‘या’ चित्रपटातून करणार कमबॅक