घरताज्या घडामोडीजेएनयूत जाणं हा दीपिकाचा पीआर स्टंट - रंगोली चंदेल

जेएनयूत जाणं हा दीपिकाचा पीआर स्टंट – रंगोली चंदेल

Subscribe

जवाहरलाल नेहरू विद्यापीठात झालेल्या हल्ल्याच्या निषेध करण्यासाठी बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने बुधवारी जेएनयू गाठलं. यानंतर दीपिकावर सोशल मीडियावरून टीका होऊ लागल्या. आता अभिनेत्री कंगना रनौतची बहीण रंगोली चंदेलने दीपिकाचा हा पीआर स्टंट असल्याचं बोलली आहे. नुकतचं कंगनाने ‘छपाक’ या चित्रपटासाठी दीपिकाचे आणि मेघना गुलजारचे आभार मानले होते. तसंच या चित्रपटामुळे मला रंगोलीच्या अॅसिड हल्ल्याची आठवण झाल्याचं म्हटलं होत.

- Advertisement -

रंगोलीने दीपिकाला सर्वात मोठी पीआर क्वीन आणि जेएनयूला भेट देणं हा पीआर स्टंट असल्याचं म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी कंगनाच्या बहिणीने ‘छपाक’च्या टीमचे आभार मानून कंगनाचा एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यात कंगना म्हणाली होती की, ‘छपाक’चा ट्रेलर पाहून तिला रंगोलीच्या अॅसिड हल्ल्याची आठवण झाली. या महत्त्वाच्या विषयावर भाष्य करणारा चित्रपट तयार केल्याबद्दल तिने आभार मानले होते.

- Advertisement -

रंगोली म्हणाली की, ‘कंगनाच्या म्हणण्यानुसार दीपिका ही एक वेगळ्या दर्जाची अभिनेत्री आहे. ती सर्वात मोठी पीआर क्वीन असून तिच जेएनयूत जाणं हा तिचा पीआर स्टंट आहे.’ तसंच रंगोलीने पुढे असं म्हटलं की, ‘कधी तिने उरी, पुलवामा हल्ला, कलम ३७० किंवा सीएए याविषयी देशातील कोणत्याही विचारसरणीला समर्थन केले आहे? तिला जेएनयू प्रकरणात रस आहे यावर माझा अजिबात विश्वास नाही’, असं कंगनाच्या बहिणीने ट्विट केलं आहे.


हेही वाचा – सारा-कार्तिकच्या अफेअरवर सावत्र आई करिनाची प्रतिक्रिया


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -