घरमनोरंजनकरण- फराहने एकमेकांची उडवली जबरदस्त खिल्ली; फ्रेंडशिप डेनिमित्त शेअर केला मजेशीर...

करण- फराहने एकमेकांची उडवली जबरदस्त खिल्ली; फ्रेंडशिप डेनिमित्त शेअर केला मजेशीर व्हिडीओ

Subscribe

बॉलिवूडची डान्स कोरिओग्राफर फराह खान आणि चित्रपट निर्माता करण जोहर एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत. ते मैत्री पलीकडे एकमेकांना चांगले जवळून ओळखतात. त्यामुळे फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने करण आणि फराहने एक व्हिडिओ शेअर केला आहे. दोघही एकमेकांची टांग खेचण्यात किती पटाईत आहेत हे या व्हिडीओतून दिसून येतेय. हा मजेशीर व्हिडीओ त्यांनी एकमेकांना टॅग केला आहे. यामध्ये करण फराहच्या फॅशन सेन्सची खिल्ली उडवताना दिसत आहे. याला प्रत्युत्तर देताना फराहही त्याचा खरपूस समाचार घेताना दिसत आहे.

फराह खान आणि करण जोहरने शनिवारी रात्री त्यांच्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तो फराह खानच्या फॅशन सेन्सची खिल्ली उडवतोय. करण तिला लाल कपडे परिधान करण्यावरून स्टॉप साईन असे संबोधतो. तसेच तिच्या नेकपीसचीही खिल्ली उडवतो आणि म्हणतो की, ते एखाद्या मेडलसारखे दिसते. त्यामुळे फॅशन म्हणून तू ते घालू शकत नाही.

- Advertisement -

यावर फराह खानही लगेच तोडीस तोड उत्तर देत म्हणते की, नाही, हे तुमच्याशी 25 वर्षांच्या मैत्रीसाठी आहे! यानंतर फराहने करण जोहरच्या शर्टवरून खिल्ली उडवली आहे. करणच्या या ब्लॅक शर्टवर अनेक चेहरे आहेत. ज्यावरून ती म्हणतेय की, “अरे देवा, तुझा शर्ट. यावर बरेच चेहरे आहेत. तुमचेही अनेक चेहरे आहेत. एक यशस्वी लोकांसाठी, एक तितक्या यशस्वी लोकांसाठी नाही. खरं आहे का?”

वरुण धवनने बनवला व्हिडिओ 

करण जोहरने उत्तर दिले, “फराह मी पक्षपाती. प्लीज, नाही, मग मी तुझ्याशी बोलणार नाही.” व्हिडिओला कॅप्शन देत करणने लिहिले की, “ज्या रॅपिड फायरची तुम्हाला कधी माहिती नव्हती, याची तुला गरज आहे!!! # कराह व्हिडिओ क्रेडिट्स – वरुण धवन.” करण आणि फराहचा हा मजेदार व्हिडिओ वरुण धवनने रेकॉर्ड केला आहे, ज्याचे श्रेय करणने दिले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Karan Johar (@karanjohar)

- Advertisement -

करण जोहर आणि फराह खान बऱ्याच काळानंतर ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटासाठी काम करत आहेत. त्यांनी शेवटचे ‘स्टुडंट ऑफ द इयर’ मध्ये एकत्र काम केले होते, ज्यात आलिया भट्ट, वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. फराहने या चित्रपटात कॅमिओही केला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Farah Khan Kunder (@farahkhankunder)


हेही वाचा : आमीर खानच्या आयुष्यातील ‘या’ आहेत दोन स्पेशल स्त्रिया


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -