बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफने २००५ मध्ये ‘मैने प्यार क्यू किया?’ या चित्रपटातून पदार्पण केलं. या चित्रपटात ती बॉलिवूडच्या भाईजानसोबत दिसली होती. त्यानंतर तिने अनेक चित्रपट केलं. मात्र यादरम्यान तिचं नावं सलमान खान आणि रणवीर कपूरशी जोडलं गेलं. पण आता कतरिनाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये तिने सुंदरसा लेहेंगा घातला असून ती सात फेऱ्या मारताना दिसत आहे. कतरिनाच्या लग्नाचे साक्षीदार बॉलिवूडचे बिग बी आणि त्यांची पत्नी आहे. याशिवाय तेलगू सिनेमा स्टार नागार्जुन, कन्नड अभिनेता शिवा राजकुमार आणि प्रभु गणेशन देखील तिच्या लग्नाच्या फोटोमध्ये दिसतं आहेत.
मात्र कतरिनाचे प्रत्यक्षात लग्न झाले नसून हे एक ज्वेलर्स ब्रँडच्या जाहिरातीसाठी शूट मधील फोटो आहेत. अमिताभ बच्चन यांच्या फॅन क्लबने हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या जाहिरातीमध्ये कतरिना वधूच्या भूमिकेत आहे. या लग्नाचा सेट भव्यदिव्य आहे. फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की अमिताभ बच्चन आणि जया बच्चन हे दोघे कतरिनाला हात पकडून मंडपात नेताना दिसतं आहेत. तसंच यामध्ये कतरिनाचा वर कोण आहे हे अजूनपर्यंत समोर आलेले नाही आहे. जाहिरातीमध्ये कतरिना कैफच्या लग्ना पूर्ण रोयल लूक आहे. खूप सुंदर अशी सजावट केली आहे.
यापूर्वी कतरिनाने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता. शूटिंग दरम्यानचा हा फोटो होता. ज्यामध्ये वधूच्या लेहेंगामध्ये ती दिसतं आहे. कतरिनाचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. लवकरच कतरिना ‘सूर्यवंशी’ या चित्रपटातून दिसणार आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित या चित्रपटामध्ये कतरिनासोबत अक्षय कुमार देखील प्रमुख भूमिकेत आहे. २७ मार्चला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.