घरमनोरंजन‘खिलाडी’कुमारने 'रक्षाबंधन'साठी वाढवले वजन

‘खिलाडी’कुमारने ‘रक्षाबंधन’साठी वाढवले वजन

Subscribe

बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अर्थात अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) आपल्या उत्तम फिटनेससाठी ओळखला जातो. यासह सोशल मीडियावरही चाहत्यांसाठी अनेक फिटनेस व्हिडिओ शेअर करत असतो. यामुळे अनेकांसाठी अक्षय कुमार एक फिटनेस आयकॉन बनला आहे. अक्षयने आपल्या कारकिर्दीतील एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपटात काम केले आहे. अक्षयच्या अॅक्शन चित्रपटांना चाहत्यांची सर्वाधिक पसंती असते. खिलाडी कुमार वेगवेगळ्या विषयावर आधारित चित्रपट करण्याला प्राधान्य देतो. अशा परिस्थितीत, आता अक्षयने बहिणींसाठी ‘रक्षाबंधन’ (Raksha Bandhan) चित्रपटाची खास भेट आणली आहे. या चित्रपटात अक्षय पुन्हा नव्या स्टाईलमध्ये दिसणार आहे. नुकताच या चित्रपटातील शुटिंगदरम्यानचे अक्षयचे काही फोटो समोर आले आहेत. यात फिटनेस फ्रीक अक्षय कुमार अधिक जाडा वाटतोयं. अक्षयने आपले पोटं अधिक वाढवले आहे. अक्षयचे वाढते वजन पाहता चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

‘रक्षाबंधन’च्या सेटवरील अक्षयचा लूक

आनंद राय यांच्या आगामी रक्षाबंधन चित्रपटासाठी अक्षय कुमार अधिक मेहनत घेत आहे. या चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी अक्षयने आपले वजन ५ किलोने वाढवले आहे. याभूमिकेविषयी अक्षय सांगतो की, वजन वाढण्याची आणि कमी करण्याची प्रोसेस त्याला अधिक आवडते. ही प्रक्रिया तो अगदी नैसर्गिकरित्या फॉलो करतो. यामुळे त्याला आईने हाताने बनवलेला हलवा खाण्याची संधी मिळते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bhumi 🌻 (@bhumipednekar)

- Advertisement -


रक्षाबंधन या चित्रपटात अक्षय ४ बहिणीं सोबत दिसणार असून भाऊ आणि बहिणीचे सुंदर नाते चाहत्यांसमोर सादर केले जाईल. अक्षयसोबत भूमी पेडणेकर या चित्रपटात मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. पुढच्या वर्षात हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होईल, अशी अपेक्षा आहे. रक्षबंधन हा चित्रपट २०२२ मध्ये प्रदर्शित होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. यापूर्वी अक्षय कुमारने सूर्यवंशई या चित्रपटासाठी आपले वजन ६ किलोने वाढवले होते.


India Corona Update: देशात आज ३७ हजार १५४ नव्या कोरोनाबाधितांची नोंद, तर रिकव्हरी रेट ९७.२२ टक्क्यांवर


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -