Sunday, June 4, 2023
27 C
Mumbai
घर मनोरंजन Sidharth Malhotra पाहून लाजली Kiara Advani, भर कार्यक्रमात मारली मिठी

Sidharth Malhotra पाहून लाजली Kiara Advani, भर कार्यक्रमात मारली मिठी

Subscribe

बॉलिवूडमधील नवे लव्ह बर्ड्स म्हणून अभिनेत्री कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांची चर्चा सुरु आहे. मात्र अद्याप दोघांनीही यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. कियारा आणि सिद्धार्थने शेरशाह चित्रपटात एकत्र काम केले होते. या चित्रपटातील दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच पसंतीस पडली होती. अशातच सोशल मीडियावर त्यांच्या अफेअरच्या आणि डेटिंगच्या चर्चांना उधाण आले आहे. अशातच सोशल मीडियावर दोघांचा एक नवा क्यूट व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. जो चाहत्यांना फारचं आवडतोय. या व्हिडीओमध्ये कियारा सिद्धार्थला पाहून चक्का लाजतेय. तसेच पुढे चालत येत ती सिद्धार्थाला खूप प्रेमाने मिठी मारताना दिसतेय.

नुकत्याच पार पडलेल्या दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2022 मधील हा व्हिडीओ आहे. जो आता तुफान व्हायरल होतोय. या अवॉर्ड फंक्शनमध्ये सिद्धार्थला पाहताच कियारा अगदी लाजत चालत आली आणि तिने सिद्धार्थला येऊन घट्टा मिठी मारली. यावेळी सिद्धार्थ मल्होत्रा पापाराझींसमोर पोझ देता होता, मात्र कियारला पाहताच तो देखील खूप खुश झाला. यावेळी सिद्धार्थने पाहताच कियारा चक्क लाजू लागली आणि मिठी मारत त्याचे अभिनंदन केले.

- Advertisement -

या व्हिडिओमध्ये कियारा अडवाणीने पिवळ्या रंगाची साडी नेसली असून त्यात ती खूपचं सुंदर दिसत आहे. मोठे कानातले आणि अंबाडा घालून तिने आपल्या लूक पूर्ण केला होता. तर सिद्धार्थने ब्लॅक रंगाचा कोट परिधान केला होता. या व्हिडीओमध्ये कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​एकमेकांसोबत खूप आनंदी दिसत आहेत. दोघांना पाहून असे वाटले की, या दोघांमध्ये काहीतरी नक्कीच शिजत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

- Advertisement -

दादासाहेब पुरस्कार सोहळ्यात ‘शेरशाह’ला  सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून गौरवण्यात आले. विष्णुवर्धन दिग्दर्शित या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्राने कारगिल युद्धाचे नायक शहीद कॅप्टन विक्रम बत्रा यांची भूमिका साकारली आहे. त्याचवेळी या चित्रपटात त्याच्यासोबत कियारा अडवाणीही महत्त्वाच्या भूमिकेत होती. या पुरस्कार सोहळ्यात सिद्धार्थ मल्होत्राला ‘शेरशाह’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कारही मिळाला आहे. ज्याबद्दल तो खूप आनंदी आहे.

सिद्धार्थसोबतच्या रिलेशनशिपवर कियारी म्हणाली की…

कियारा अडवाणीने एका मुलाखतीत स्वतःबद्दल आणि सिद्धार्थ मल्होत्राबद्दलच्या नात्यावर भाष्य केलं होतं. अभिनेत्री म्हणाली होती की, ‘सिद्धार्थ सह-अभिनेता म्हणून खूप केंद्रित आहे. त्याला चित्रपटासाठी खूप तयारी करायला आवडते आणि भरपूर वाचनही तो करतो, अगदी माझ्यासारखाच आहे, त्यामुळे आमच्यात चांगले संबंध आहेत. एक मैत्रीण म्हणून मी म्हणेन की, तो माझा इंडस्ट्रीतील सर्वात जवळच्या मित्रांपैकी एक आहे. तो नेहमी उत्साही असतो आणि अशा व्यक्तीच्या भोवती असणे ही एक चांगली गोष्ट आहे.

कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा शेवटचे ‘शेरशाह’ चित्रपटात दिसले होते. या चित्रपटात कियाराने विक्रम बत्रा यांच्या मैत्रिणीची भूमिका साकारली होती. या चित्रपटाला प्रेक्षकांकडूनही खूप प्रेम मिळाले तसेच कियारा-सिद्धार्थच्या जोडीचेही खूप कौतुक झाले. ‘शेरशाह’ हा चित्रपट 2021 साली प्रदर्शित झाला होता.


कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी मराठी भाषेच्या अभिजात दर्जाबाबतची घोषणा करावी; सुभाष देसाईंची केंद्राकडे मागणी


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -