घरमनोरंजननिर्मात्याने पूजा हेगडेला भेट दिली कार? संतप्त अभिनेत्री म्हणाली...

निर्मात्याने पूजा हेगडेला भेट दिली कार? संतप्त अभिनेत्री म्हणाली…

Subscribe

एका पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत निर्मात्याने तिला कार गिफ्ट केली होती का, असा प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना अभिनेत्री पूजा म्हणाली...

पूजा हेगडेचा आगामी चित्रपट ‘किसी का भाई किसी की जान’ अवघ्या काही दिवसातच चित्रपटगृहात दाखल होणार आहे. मोठ्या पडद्यावर तिला सलमान खान सोबत पाहण्यासाठी तिचे चाहते खूप उत्सुक आहेत. चित्रपटाची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतसा पूजा हेगडेबाबतही नवनवीन वाद निर्माण होत आहेत. तिच्याबद्दल रोज काही ना काही बातम्या येत असतात.

पूजा हेगडे आणि सलमान खान एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा अलीकडेच आली होती. पूजा हेगडेने ही अफवा असल्याचं सांगितलं होतं. “मी सध्या अविवाहित आहे आणि माझे लक्ष फक्त तिच्या करिअरवर आहे”, असं तिने त्यावेळी सांगितलं होतं. ही अफवा अजून पुर्णपणे बंद झाली नाही तोवर आणखी एका बातमीने ही अभिनेत्री चर्चेत आली आहे.

- Advertisement -

एका पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत निर्मात्याने तिला कार गिफ्ट केली होती का, असा प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना अभिनेत्री पूजा म्हणाली, “माझ्याबद्दल दररोज काहीतरी नवीन प्रसिद्ध होत आहे. मी लोकांना प्रत्येक गोष्टीचे उत्तरं देऊ शकत नाही. प्रत्येक अफवेवर स्पष्टीकरण देऊ शकत नाही.”

निर्मात्यांकडून भेट म्हणून कार मिळाली?
एका निर्मात्याने तिला कार गिफ्ट केल्याच्या चर्चांवर पुढे बोलताना पूजा हेगडे म्हणाली की, ही बातमी कळताच तिने निर्मात्याला स्क्रीनशॉट पाठवला. या स्क्रीनशॉटमध्ये तिने त्याला एक मेसेज पाठवलेला दिसत आहे. जर मला बदनाम करायचं असेल तर, कमीत कमी मला तर गाडी द्या, असं या मेसेजमध्ये लिहिण्यात आलं होतं.

- Advertisement -

यापूर्वी पूजा सलमान खानला डेट करत असल्याची बातमी आली होती. जेव्हा सलमान पूजाचा भाऊ ऋषभ हेगडेच्या भावाच्या लग्नात गेला तेव्हा या अफवांना उधाण आले. मात्र, तिने या बातमीचेही खंडन केले आणि त्यांना अफवा म्हटलं होतं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -