आमिरसोबत किसिंग सीन करताना लागले तीन दिवस

bollywood krishma kapoor opens up on her kissing scene with aamir khan in raja hindustani
आमिरसोबत किसिंग सीन करताना लागले तीन दिवस

बॉलिवूडची अभिनेत्री करिश्मा कपूर ९०च्या दशकातील सर्वात सुंदर आणि गुणी अभिनेत्री आहे. जरी आता करिश्मा कपूर चित्रपटांपासून दूर असली तरी ती सोशल मीडियावर फार अॅक्टिव्ह असते. ९० दशकात अनेक करिश्माचे चित्रपट हिट झाले आहेत. त्या काळात करिश्माने जवळपास प्रत्येक सुपरहिट अभिनेत्यासोबत काम केलं आहे. आता करिश्माने ‘मेंटलहुड’ या वेबसिरीजच्या माध्यमातून डिजिटल प्लॅटफॉर्मवर पाऊल ठेवले आहेत. त्यामुळे आजकाल ती वेबसीरिजच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. याच वेबसिरीजच्या प्रमोशन दरम्यान तिने आपल्या सुपरहिट फिल्म ‘राज हिंदुस्थानी’ मधील आमिर खानसोबतचा किसिंग सीनबद्दल एका खुलासा केला आहे.

View this post on Instagram

? #shadow

A post shared by KK (@therealkarismakapoor) on

अभिनेत्री करिश्मा कपूरने नुकतीच तिच्या नव्या वेबसिरीजनिमित्ताने फिल्म समीक्षक राजीव मसंद यांना मुलाखत दिली. या मुलाखती दरम्यान १९९६ साली सुपरहिट झालेला ‘राज हिंदुस्थानी’ या चित्रपटातील आमिरसोबतच्या किसिंगबद्दल करिश्मा बोलली. आमिरसोबत किसिंग सीन करताना तिला कोणत्या प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागला हे करिश्माने सांगितलं.

त्या काळात बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये करिश्मा आणि आमिर ‘राजा हिंदुस्थानी’ मधला किसिंग सीन खूपच चर्चेत आला होता. सर्वात लाँग किसिंग सीन म्हणून या चित्रपटात सीन मानला जात होता. हाच किसिंग सीन करणं हे करिश्मासाठी सोप नव्हतं असं तिने मुलाखतीत सांगितलं.

करिश्मा या किसिंग सीन बद्दल बोली की, ‘हा किसिंग सीन चक्क पूर्ण करण्यासाठी तीन दिवस लागले. मी विचार करत होते हा किसिंग सीन कधी संपेल. कारण हा सीन फेब्रुवारी महिन्यात थंडीच्या दिवसात संध्याकाळी ६ वाजता शूट करत होतो. त्यामुळे मी थंडीमुळे कुडकुडत होते.’ ‘राजा हिंदुस्थानी’ या चित्रपट २४ वर्षांपूर्वी आला होता.


हेही वाचा – Video: अर्जुन रेड्डी पडता पडता वाचला!