घरमनोरंजनएका महिलेसोबत असं करणं... इंटिमेट सीनवर मल्लिका शेरावतचा खुलासा

एका महिलेसोबत असं करणं… इंटिमेट सीनवर मल्लिका शेरावतचा खुलासा

Subscribe

बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय ठरली आहे. बॉलिवूडपासून दूर असली तरी मल्लिकाने आता वेबसीरिजमध्ये पदार्पण केले आहे. नकाब या वेबसीरिजच्या माध्यमातून ती प्रेक्षकांच्या भेटीस आली. या सीरिजमध्ये मल्लिकाने अभिनेत्री ईशा गुप्तासोबत काही इंटिनेट सीन केले आहेत. यावर तिने एका अभिनेत्याच्या तुलनेत अभिनेत्रीसह इंटिमेट सीन करणं सोप्प असल्याचे म्हटले आहे. मल्लिकाने एका मुलाखतीत सीरिजमधील इंटिमेट सीनबद्दल उघडपणे मत मांडलं आहे.

ख्वाहिश या चित्रपटात मल्लिकाने १७ किसिंग सीन्स केले होते. ‘अभिनेत्रीशी इंटिनेट साधणं मुळीच कठीण नव्हतं. तुलनेने पुरूषासोबत इंटिमेट सीन देणं अवघड असतं. बॉलिवूडमधील एक बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून मल्लिकाला ओळखले जाते. यात २००३ साली प्रदर्शित झालेल्या ‘ख्वाहिश’ चित्रपटाच्या माध्यमातून मल्लिकाने कलाविश्वात पदार्पण केलं.

- Advertisement -

त्यानंतर अभिनेता इमरान हशमी स्टारर ‘मर्डर’ चित्रपटात तिने बॉल्डनेसच्या सर्व मर्यादा पार केल्या होत्या. मात्र या सीन्समुळे तिच्यावर टीकादेखील झाली होती. पण मल्लिकाने याकडे निव्वळ दुर्लक्ष केले. २६ वर्षांच्या अभिनेत्रीवर ‘नकाब’ ही वेब सीरिज आधारित आहे. या अभिनेत्रीच्या आत्महत्याने नंतर संपूर्ण देशात खळबळ उडली. यात पोलीस देखील तिच्या आत्महत्येचे कारण शोधत असतात. या सीरिजमध्ये मल्लिकाने जोहरा मेहराची भूमिका साकारली आहे. बॉलिवूडमध्ये मल्लिकाला हवं तेवढं यश मिळाले नसे तरी तिने आता वेब सीरिजमधून जोरदार पदार्पण केलं आहे.


Bigg Boss Marathi 3 : २ घटस्फोट, ११ वर्ष लहान डान्सरसोबतच्या अफेअरमुळे स्नेहा वाघ चर्चेत


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -