भारतीय पुरुषांनी प्रेम दिले पण महिलांनी…; मल्लिका शेरावतने व्यक्त केली खदखद

मल्लिका लवकरच RK / RKAY या चित्रपटात झळकणार आहे. यासाठी अभिनेत्री तिच्या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहे

Bollywood mallika sherawat says indian men always loved her know why

मल्लिका शेरावत बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आजकाल मल्लिका तिच्या आगामी RK RKAY चित्रपटांव्यतिरिक्त बोल्ड विधानांमुळेही चर्चेत आहे. एका मुलाखतीतच मल्लिका असे काही बोलून गेली की तिच्या वक्तव्याची आता जोरदार चर्चा सुरु आहे. भारतीय पुरुषांनी तिला प्रेम दिले, परंतु महिलांनी तिला कधीही पसंत केले नाही असं विधान मल्लिकाने केलेय. एकूणच तिने बोल्ड लूकवरून होत असलेल्या टीकेवर खदखद व्यक्त केलीय.

बिकिनी लूकबाबत  काय म्हणाली मल्लिका?

मल्लिका शेरावतने मुलाखतीत सांगितले की, चित्रपटांमधील बोल्ड सीन्सवरून तिला नेहमीच जज केले जाते. मला वाटते की, माझे ग्लॅमर त्यांच्यासाठी खूप चांगले होते. मर्डर या चित्रपटात मी बिकिनी परिधान केली होती. माझ्या आधीही अनेक अभिनेत्रींनी बिकिनी परिधान केली होती. पण मी बेफिकीर होतो. माझं फक्त एवढचं होत की, माझ्याकडे सुंदर शरीर आहे.

मल्लिका पुढे म्हणाली- मी बीचवर साडी नेसून जावे अशी तुमची इच्छा आहे का? बिल्कूल नाही, मी बिकिनीच घालेन. मी प्रत्येक क्षण साजरा केला. पण लोकांसाठी विशेषत: महिलांसाठी मी बिकिनी घातली हे पाहणे अधिक कठीण झालेय. पुरुषांना माझा काहीच प्रॉब्लम नव्हता. भारतातील पुरुषांनी मला प्रेम दिले आहे. पण काही स्त्रिया माझ्याबद्दल वाईट विचार करतात.

मल्लिका लवकरच RK / RKAY या चित्रपटात झळकणार आहे. अभिनेत्री तिच्या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहे. मल्लिका शेरावतच्या फिल्मी करिअरबद्दल बोलायचे झाले तर तिने 2003 मध्ये ख्वाइश या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर ती महेश भट्टच्या मर्डर या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात मल्लिकासोबत इमरान हाश्मी मुख्य भूमिकेत होता. हा चित्रपट बॉलिवूडमध्ये सर्वात सुपरहिट ठरला होता. पण मल्लिकाच्या या दोन्ही चित्रपटांनी तिला एक बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळख मिळवून दिली. यामुळे मल्लिकाच्या आगामी चित्रपटाला चाहत्यांचा कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे महत्त्वाचे आहे.


विमान प्रवास होणार स्वस्त; 26 नवीन उड्डाणे होणार सुरु, जाणून घ्या रुट लिस्ट आणि प्रवासी भाडे