Tuesday, February 23, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन बॉलिवूड चित्रपट प्रदर्शनाच्या तारखा जाहीर, पहा कोणत्या दिवशी होणार तुमचे आवडते चित्रपट...

बॉलिवूड चित्रपट प्रदर्शनाच्या तारखा जाहीर, पहा कोणत्या दिवशी होणार तुमचे आवडते चित्रपट प्रदर्शित

अनेक मोठ्या कलाकारांचे चित्रपट या काळात प्रदर्शित होणार आहेत. येणाऱ्या अनेक सणांच्या मुहूर्तावरही अनेक चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहेत.

Related Story

- Advertisement -

कोरोनाच्या काळात चित्रपटगृहे बंद झाल्याने अनेक चित्रपट प्रदर्शनाच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या. सिनेसृष्टी आता हळू हळू पूर्वपदावर येऊ लागली आहे. बॉलिवूडच्या रखडलेल्या सिनेमांचे वेळापत्रकही लागले आहे. बॉलिवूड प्रमाणेच हॉलिवूड चित्रपटही प्रदर्शित होण्यासाठी तयार आहेत. त्यामुळे येत्या काळात प्रेक्षकांना अनेक चित्रपट पाहण्याची संधी मिळणार आहे. अनेक मोठ्या कलाकारांचे चित्रपट या काळात प्रदर्शित होणार आहेत. सणांच्या मुहूर्तावरही अनेक चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार आहेत. येत्या ११ मार्चला राजकुमार राव आणि जान्हवी कपूर यांचा ‘रुही’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तर अनेक दिवस प्रेक्षक वाट पाहत असलेला अक्षय कुमारचा ‘सूर्यवंशी’ हा चित्रपटही येत्या काळात प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. अक्षय कुमारचा ‘बेल बॉटम’ हा चित्रपट २८ मे ला पाहता येणार आहे.

रणवीर सिंगचा ८३ हा ४ जूनला तर नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ हा चित्रपट १८ जूनला प्रदर्शित करण्यात येणार आहे. सालाबादप्रमाणे याही वर्षी अभिनेता सलमान खानचा चित्रपट ईदच्या दिवशी प्रदर्शित होणार आहे. सलमानचा ‘राधे’ हा चित्रपट १२ मे प्रदर्शित होणार आहे. तर जॉन अब्रहमचा ‘सत्यमेव जयते’ हा चित्रपट १४ मेला प्रदर्शित होणार आहे.

- Advertisement -

दसऱ्याच्या मुहूर्तावर ‘आरआरआर’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर दिवाळीच्या मुहूर्तावर ‘पृथ्वीराज’ आणि ‘जर्सी’ हे चित्रपट ५ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहेत. वर्षांच्या शेवटी म्हणजेच नाताळमध्ये रणबीर कपूरचा ‘ब्रम्हास्र’ आणि अमिर खानचा ‘लाल सिंग चढ्ढा’ हे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्याचप्रमाणे २३ एप्रिलला ‘बंटी और बबली २’ हे चित्रपट प्रेक्षकांना पाहता येणार आहे. ‘फास्ट अँन्ड फ्युरियस ९’ आणि ‘बेल बॉटम’ हे चित्रपट २८ मेला प्रदर्शित होणार आहे.


हेही वाचा – ऐश्वर्या-अभिषेकचा लेकीसोबत ‘देसी गर्ल’ गाण्यावर डान्स

- Advertisement -

 

- Advertisement -