Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन Sonu Sood To Host Rodies : 'रोडीज'मधून रणविजय 'एक्झिट' तर सोनू सूदची...

Sonu Sood To Host Rodies : ‘रोडीज’मधून रणविजय ‘एक्झिट’ तर सोनू सूदची ‘एन्ट्री’

Subscribe

टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘एमटीव्ही रोडीज’चा नवा सीझन येत आहे. साहस आणि ट्विस्टने भरलेला हो शो तरुणाईत अधिकचं फेमस आहे. मात्र गेली 18 वर्षे शो होस्ट केल्यानंतर आता रणविजय सिंघने शोमधून एक्झिट घेतली आहे. त्यामुळे बॉलिवूड अभिनेता सोनू सूद आता रणविजयच्या जागी शो होस्ट करताना दिसणार आहे.

सोनू सूदने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ पोस्ट करत याची माहिती दिली आहे. त्यामुळे सोनू सूद रोडीजचा पुढचा सीझन होस्ट करणार आहे. ज्याचे शूटिंग दक्षिण आफ्रिकेत होणार आहे. या सीझनमध्ये आत्तापर्यंतचे सर्वात लोकप्रिय स्पर्धक सहभागी होणार आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonu Sood (@sonu_sood)

- Advertisement -

सोनू सूद दक्षिण आफ्रिकेत जाण्यापूर्वी खातोय समोसे

सोनू सूद दक्षिण आफ्रिकेत जाण्यापूर्वी एका दुकानात समोसे खाताना दिसतोय. याचा एक व्हिडीओ त्यांने शेअर केला आहे. यात त्याने समोसे खाण्यामागचे एक मजेदार कारण सांगितले आहे. सोनू सूद म्हणतोय की, “माझा सर्वांना नमस्कार, मी सोनू सूद आणि सध्या मी मोगा येथे आहे, मी एका समोसाच्या दुकानात असून जे एक अप्रतिम दुकान आहे, जसे की तुम्हा सर्वांना माहीत आहे की, मी रोडीजचा पुढील नवीन सीझन होस्ट करणार आहे. मी याबद्दल खूप उत्सुक आहे कारण यात खूप मजा आणि साहस असणार आहे. कारण देशातील सर्वोत्कृष्ट रोडीज अनेक आव्हानांचा सामना करताना आपण पाहणार आहोत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonu Sood (@sonu_sood)

- Advertisement -

सोनू सूद पुढे सांगतो की, रोडीजचे शूटिंग दक्षिण आफ्रिकेत होणार आहे आणि त्यामुळे जाण्यापूर्वी मी काही समोसे खावे असा विचार करतोय, कारण दक्षिण आफ्रिकेत चाट, समोसे मिळणार नाहीत. व्हिडिओ शेअर करताना सोनू सूदने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘रोडीजसोबत माझ्या आयुष्यातील एक नवीन साहस सुरू होणार आहे, हा प्रवास एक वेगळा प्रवास असणार आहे!’ त्यामुळे एमटीव्ही रोडीजचा आगामी सीझन होस्ट करण्यासाठी सोनू सूद खूप उत्सुक आहे.

रणविजय सिंघ अनेक वर्षांपासून रोडीज आणि एमटीव्ही शोचा भाग आहे. फक्त रोडीजच नाही तर ‘स्प्लिट्सविला’ सारखा शोही त्याने यशस्वीपणे होस्ट केला आहे. काही महिन्यांपूर्वी त्याने सोनी टीव्हीवरील ‘शार्क टँक इंडिया’ ची होस्ट म्हणून जबाबदारी स्वीकारली. शार्क टँकने पहिल्याच सीझनला चांगली पसंती मिळाली. त्यामुळे लवकरच या शोचा सीझन 2 प्रेक्षकांना पाहायला मिळेल, ज्याला रणविजय सिंघ होस्ट करताना दिसणार आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -