घरट्रेंडिंग'ओ करोना कभी मत आना' मुंबई पोलिसांच्या ट्विटवर श्रद्धाचा भन्नाट रिप्लाय

‘ओ करोना कभी मत आना’ मुंबई पोलिसांच्या ट्विटवर श्रद्धाचा भन्नाट रिप्लाय

Subscribe

मुंबईमध्ये कोरोना व्हायरसपासून लोकांना जागरूक करण्यासाठी मुंबई पोलिसांनी श्रद्धा कपूरच्या 'स्त्री' चित्रपटातील 'ओ स्त्री कल आना' या डायलॉगच्या जागी 'ओ कोरोना कभी मत आना' असे लिहिले आहे.

बॉलिवूड क्षेत्रातील कलाकार मंडळीनी ३ मे पर्यंत वाढवण्यात आलेल्या लॉकडाऊनचे समर्थन केले आहे. कोरोना विरोधातील युद्धात लढण्यासाठी ही कलाकार मंडळी आर्थिक मदतीसह सोशल मीडियावर जनजागृती करण्याचे देखील काम करत आहेत. दरम्यान अभिनेत्री श्रद्धा कपूरचा ‘स्त्री’ चित्रपट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या चित्रपटातील एका प्रसिद्ध डायलॉगचा वापर मुंबई पोलिसांनी केला आहे. या डायलॉगचा वापर करत मुंबई पोलिसांनी विनोदी संदेश तयार करून मुंबई पोलीस या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला आहे. सोशल मीडियावर हे ट्विट चांगलेच व्हायरल होत असून हे ट्विट अभिनेत्री श्रद्धाने तिच्या इंस्टाग्रामवर देखील शेअऱ करत रिप्लाय दिला आहे.

मुंबईमध्ये कोरोना व्हायरसपासून लोकांना जागरूक करण्यासाठी मुंबई पोलिसांनी श्रद्धा कपूरच्या ‘स्त्री’ चित्रपटातील ‘ओ स्त्री कल आना’ या डायलॉगच्या जागी ‘ओ कोरोना कभी मत आना’ असे लिहिले आहे. मुंबई पोलिसांनी हा संदेश आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला आहे. यावेळी त्यांनी ‘घरी रहा, सुरक्षित रहा’ असा एकमेव मंत्र सांगितला आहे.

- Advertisement -

ट्विटवर श्रद्धाने दिला असा रिप्लाय

मुंबई पोलिसांच्या या ट्विटला श्रद्धा कपूरने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहे. यासोबतच तिने असे देखील लिहिले की, ‘बिलकुल सही!, तसेच ‘घरी रहा, सुरक्षित रहा’ हाच एकमेव मंत्र आहे. #EverySTREEtSafe.’

- Advertisement -

यापूर्वी देखील पोलिसांनी चित्रपटातील डायलॉगचा वापर करत कोरोना व्हायरस दरम्यान नागरिकांमध्ये जनजागृती केली होती.

अनोख्या स्टाईलने सोशल डिस्टन्सिंचा सल्ला

पुण्यापाठोपाठ नागपूर पोलीसदेखील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तसेच नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी अनोख्या हटक्या स्टाईलचा अवलंब करताना दिसले आहे. यामध्ये नागपूर पोलिसांनी सोशल डिस्टन्सिंचा सल्ला नागरिकांना देताना एक ट्विट केले आहे. हे ट्विट करताना त्यांनी दीपिका पदुकोण आणि शाहरूख खान यांची मुख्य भूमिका असणाऱ्या चेन्नई एक्स्प्रेस चित्रपटातील फोटोच शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना या पोलिसांनी या फोटोला कॅप्शन देताना सुद्धा चित्रपटातील डायलॉगचाच वापर केला आहे.

या ट्विटमध्ये नागपूर पोलिसांनी असे लिहिले आहे की- ‘Don’t underestimate the power of Social Distancing!’ पोलिसांनी शाहरुखच्या डायलॉगचा वापर करत सोशल डिस्टन्सिंगचा सल्ला नागपूरकरांना दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -