बॉलिवूड गायिका श्रद्धा पंडितला धमकी, ओशिवरा पोलीसात तक्रार दाखल

श्रद्धा ठाकूरने अनेक हिंदी जुन्या सिनेमात गाणी गायली आहेत.

Bollywood playback singer shraddha pandit receive threat from voice message
बॉलिवूड गायिका श्रद्धा पंडितला धमकी, ओशिवरा पोलीसात तक्रार दाखल

बॉलिवूड पार्श्व गायिका श्रद्धा पंडितने तिला धमकीचा फोन आल्याप्रकरणी मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. श्रद्धा कलाकारांसाठी व्यवस्थापन करणाऱ्या एका संस्थेसाठी काम करते. तिथेच तिच्यासोबत व्यवस्थापनाचे काम करणाऱ्या एका व्यक्तिच्या विरोधात श्रद्धाने ही तक्रार दाखल केली असून तक्रारीत तिने धमकी दिल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रद्धा पंडित आणि देव ठाकूर नामक एक व्यक्ती या संस्थेसाठी एकत्र काम करतात. काही दिवसांपूर्वी दोघांमध्ये वाद झाले आणि त्यानंतर कथिक आरोपीने श्रद्धाला वॉइस मेसेज करुन धमकी देत असल्याचे सांगितले.

गायिका श्रद्धाने देव ठाकूरवर केलेले सर्व आरोप त्याने फेटाळले आहेत. माझ्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप हे खोटे असल्याचे त्याचे सांगितले आहे. देव ठाकूर याला या प्रकरणी येत्या शुक्रवारी पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगितले आहे. मी शुक्रवारी पोलीस ठाण्यात हजर राहून आपली बाजू मांडणार असल्याचे त्याने सांगितले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात अद्याप कोणताही ठोस किंवा प्राथमिक माहिती मिळालेली नाही केवळ गैरसमजातून तक्रार नोंदवण्यात आली आहे.

श्रद्धा ठाकूरने अनेक हिंदी जुन्या सिनेमात गाणी गायली आहेत. श्रद्धाने भारतीय शास्त्रीय संगीतात अभ्यास केलाय. त्याचप्रमाणे ती पार्श्वगायिका आणि तसेच एक पॉप आणि बॉलिवूड गाणीदेखील श्रद्धा गाते. १९९६पासून ती सिनेसृष्टीत पार्श्वगायन करत आहे. खामोशी, संघर्ष,खुबसूरत, राजू चाचा,दीवार,बँड बाजा बरात तर अलिकेडच कुध कुध लोचा है, जझबा सारख्या सिनेमात तिने पार्श्वगायन केले आहे.

 


हेही वाचा – 26/11 Mumbai Attack: मुंबईतील दहशतवादी हल्ल्यावर आधारित ५ चित्रपट