घरमनोरंजनबॉलीवूडची 'क्वीन' महादेवाच्या चरणी !

बॉलीवूडची ‘क्वीन’ महादेवाच्या चरणी !

Subscribe

'मणिकर्णिका' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असलेली कंगना ‘मेंटल है क्या’ , 'कबड्डी' या चित्रपटातही झळकणार आहे.

‘मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असेलली कंगना रणावतने, सध्या ‘ब्रेक’ घेतल्याचं समजतंय. शूटिंगच्या व्यस्त शेड्युल मधून वेळ काढत कंगना थेट जाऊन पोहचली आहे महादेवाच्या चरणी. कंगना सध्या कोइंबतुरमच्या आदिशक्ती आश्रमामध्ये आहे. याठिकाणचे हे खास फोटो तिच्या टीमने इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केले आहेत. यातील एका फोटोमध्ये कंगना शिवलिंगाची मनोभावे पूजा करताना दिसते आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये ती कोईम्बतूरमधील ईशा फाउंडेशनच्या हेडक्वॉरटर्स मधल्या शंकराच्या भव्य मूर्तीपुढे उभी आहे. फोटोंमधील कंगनाच्या ‘साडी’तील लूकचीही चर्चा होत आहे. कंगनाच्या या फोटोंना चाहत्यांकडून भरभरुन पसंती मिळते आहे.

 

- Advertisement -
Kangana Ranaut Coimbatore
सौजन्य- team_kangana_ranaut (instagram)

दरम्यान मणिकर्णिका या चित्रपटाव्यतिरिक्त कंगना सध्या तिच्या अनेक नव्या प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहे. सध्या ती राजकुमार रावबरोबर, ‘मेंटल है क्या’ चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. तसंच या वर्षाच्या शेवटी कंगना अनुराग बासूच्या ‘इमली’ चित्रपटाच्या शुटिंगला सुरुवात करेल. या चित्रपटाची तयारी ऑगस्टपासून सुरु होणार आहे. याशिवाय कंगना अश्विनी अय्यर तिवारीच्या ‘कबड्डी’वर आधारित चित्रपटातही झळकणार आहे. पुढीलवर्षी ती या चित्रपटाचे शुटिंग सुरु करणार आहे.

कंगनाची 

कंगनाचा ‘मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी’ हा चित्रपट २५ जानेवारी २०१९ ला रिलीज होणार आहे. तर दुसरीकडे याच तारखेला 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -