राखीचे कंगनाला चॅलेंज, म्हणाली ‘हिंमत असले तर वर्षभर तरी Lock UPP शो चालवून दाखव’

राखी सावंतने सलमान खानबद्दल बोललेल्या कंगनाच्या त्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे.

bollywood rakhi msawant has give challenge to kangana ranaut said if you have guts then run lock upp for a year
राखीचे कंगनाला चॅलेंज, म्हणाली हिंमत असले तर वर्षभर तरी Lock UPP शो चालवून दाखव

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौत लवकरचं डिजीटल क्षेत्रात डेब्यू करणार आहे. Lock UPP या रिअॅलिटी शोमधून कंगना टीव्हीच्या प्रेक्षकांसमोर येणार आहे. या शोमध्ये 16 स्पर्धक सहभागी होणार आहे. हा शो एकता कपूरचा OTT प्लॅटफॉर्म ALT बालाजी आणि MX Player वर रिलीज होईल.

नुकतीच एकता कपूर आणि कंगना रानौतने यासंदर्भात एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी अभिनेत्रीने सलमान खानच्या बिग बॉस शोबद्दल मोठं विधान केलं आहे. यात कंगनाने सलमान खानचा खोचक टोला लगावला आहे. कंगना म्हणाली की, हे तुमच्या मोठ्या भावाचे घर नाही, हा माझा जेल आहे. प्रत्येक स्पर्धकाच्या फाईल आणि त्यांची सत्य माहिती माझ्याकडे असेल. आता राखी सावंतने सलमान खानबद्दल बोललेल्या कंगनाच्या त्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. कंगनामध्ये हिंमत असेल तर तिने वर्षभर तरी तिचा Lock UPP शो चालवून दाखवावा. असं म्हणत राखीने कंगनाला एकप्रकारे चॅलेंजच दिले आहे.

राखीच्या या वक्तव्याचा व्हिडीओ बिग बॉस खबरीने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये राखी म्हणते की, मला खूप वाईट वाटले जेव्हा कंगनाने म्हणाली की, हे तुझ्या भावाचे घर नाही. तर बहीणी (कंगना रनौत) माझं एक गोष्ट ऐक… इतके दिवस फक्त भाऊच शो चालवतोय. तुझ्यात हिंम्मत असेल तर वर्षभर तरी तुझा शो चालवून दाखव. भाई गेल्या 15 वर्षांपासून हा शो चालवत आहेत. भावात खूप हिम्मत आहे, पण बहिणीकडे (कंगना) तेवढी हिंम्मत नाही.

यात राखी सावंत पुढे म्हणते की, ‘मी बहिणीला सांगू इच्छिते की, तिने तिच्या जिभेवर नियंत्रण ठेवावे. तिने आमच्या बॉलिवूडला खूप शिव्या दिल्या आहेत. आता तू परत आली का? म्हणूनच मी म्हणते की, तिने बॉलीवूडचा गैरवापर करू नये. तिला कितीही झाले तरी बॉलिवूडचीच गरज लागेल. राखी सावंतनेही लॉकअपचा भाग असण्याबाबत एक मोठं विधान केलं आहे. राखी म्हणाली की. ती एकता कपूरची खूप मोठी फॅन आहे.

ड्रामा क्वीन पुढे सांगते की, ‘मला कंगना राणौतमध्ये रस नाही. एकता कपूर जी माझी आयडॉल आहे. ती जे काही शो करते ते चांगले शो असतात. एकता बेस्ट आहे. चांगली गोष्ट म्हणजे लॉकअपसारखे नवीन शो येत आहेत. असे नवीन शो व्हायला हवेत. भरपूर रिअॅलिटी शो व्हायला हवेत. मी रियलिटी क्वीन आहे. जर एकताने मला फोन केला तर मी का जाणार नाही? एकतासाठी मला शोमध्ये जायला आवडेल, पण कंगनासाठी नाही.’ याशिवाय राखी सावंतने इतरही अनेक गोष्टी सांगितल्या आहेत.


Astro Tips : ‘व्हॅलेंटाईन डे’ ला आपल्या राशीनुसार घाला ‘या’ रंगाचे कपडे, मनासारखा जाईल दिवस