घरताज्या घडामोडीराखीने भाजीची किंमत ऐकूण भररस्त्यात केला हंगामा, व्हिडिओ झाला व्हायरल

राखीने भाजीची किंमत ऐकूण भररस्त्यात केला हंगामा, व्हिडिओ झाला व्हायरल

Subscribe

बॉलिवूडची कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन राखी सावंत नेहमी कोणत्या कोणत्या कारणांमुळे चर्चेत असते. राखीच्या सोशल मीडियावरील पोस्ट नेहमी व्हायरल होत असतात. आता राखीचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये राखी सावंत एका भाजीवाल्यासोबत भांडताना दिसत आहे. भाजीची किंमत ऐकूण राखीचा पारा सडकला आणि रागात जाऊन ती गाडीत बसली. राखीच्या या व्हिडिओला सध्या तुफान प्रतिक्रिया येत आहेत.

राखी सावंतचा हा व्हिडिओ योगेन शाह यांना आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये पाहू शकता की, राखी भाजीवाल्याला भाजीची किंमत विचारते आणि त्यानंतर ती हैराण होते. रागाच्या भरात ती म्हणते की, १ हजार ६५० रुपयांची कोणती भाजी असते? ५०० ठिक आहे, पण १ हजार ६५० रुपयांची कोणती भाजी असते? राखी सावंतचा हा अवतार पाहून अनेक लोकं तिथे जमतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by yogen shah (@yogenshah_s)

- Advertisement -

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर राखी सावंत नुकतीच बिग बॉसचा घरात चॅलेंजरच्या रुपात दिसत होती. बिग बॉस सीझन १४ मध्ये राहून तिने अनेक लोकांची मनं जिंकली. या शोमध्ये राखी चाहत्यांचे खूप मनोरंजन केलं होत. कधी ती गाणं गाताना तर कधी डान्स करताना राखी बिग बॉसच्या घरात दिसली. यापूर्वी राखी बिग बॉसच्या पहिल्या वहिल्या सीझनमध्ये सदस्य म्हणून दिसली होती. याशिवाय बॉलिवूडच्या अनेक चित्रपटात तिने प्रमुख भूमिका पार पाडली आहे. जसे की ‘मैं हूं ना’, ‘दिल बोले हड़िप्पा’, ‘जोरू का गुलाम’, ‘एक कहानी जूली की’ और ‘बुड्ढा मर जाएगा’ अशा चित्रपटातून राखी दिसली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

- Advertisement -

हेही वाचा – Coronavirus: सोनू सूदला कोरोनाची लागण, तरीही सोडवणार लोकांच्या समस्या


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -