‘पुष्पा’ फेम रश्मिका मंदाना आता रणबीर कपूरसोबत करणार रोमान्स?

bollywood rashmika mandanna joins ranbir kapoors animal movi
'पुष्पा' फेम रश्मिका मंदाना आता रणबीर कपूरसोबत करणार रोमान्स?

‘नॅशनल क्रश’ आणि ‘पुष्पा’ फेम अभिनेत्री रश्मिका मंदाना नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. दक्षिणात्य सिनेसृष्टीत आपल्या अदांनी घायळ करणारी रश्मिका आता बॉलिवूडमध्येही एन्ट्री घेण्यास सज्ज झाली आहे. रश्मिका लवकरचं बॉलिवूडचा आगामी ‘अॅनिमल’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात रश्मिका बॉलिवूडचा चॉकलेट हिरो अभिनेता रणबीर कपूरसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. ‘अर्जुन रेड्डी’ आणि ‘कबीर सिंग’ सारख्या सुपर हिट तेलुगू चित्रपटांचे दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा ‘अॅनिमल’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. या चित्रपटासाठी त्यांनी रश्मिका मंदाना आणि रणबीर कपूर ही जोडी फायनल केली आहे. या चित्रपटात रणबीर कपूरशिवाय अनिल कपूर आणि बॉबी देओल देखील मुख्य भूमिकेत आहेत.

शाहिद कपूर आणि कियारा अडवाणी स्टारर ‘कबीर सिंग’ सारखा सुपर हिट चित्रपट दिल्यानंतर संदीप रेड्डी वांगा यांच्या चित्रपटांबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. यातच ते रश्मिका आणि रणबीर या फ्रेश जोडीला पहिल्यांदाच पडद्यावर आणणार असल्याने चाहतेही अधिकच उत्सुक झालेत. याआधी अभिनेत्री परिणीती चोप्रा हीचे नाव ‘अॅनिमल’ चित्रपटासाठी फायनल झाले होते. मात्र इतर काही प्रोडेक्ट्स आणि बिझी शेड्युलमुळे परिणीतीला हा चित्रपट सोडावा लागला. मात्र आता टी सीरिजचे प्रमुख भूषण कुमार आणि संदीप रेड्डी वांगा यांनाही रश्मिका या चित्रपटासाठी योग्य वाटतेय. रणबीर आणि रश्मिका दोघेही ‘अॅनिमल’मधील त्यांच्या केमिस्ट्रीने पडद्यावर आग लावतील असा या दोघांना विश्वास आहे.’अॅनिमल’ हा चित्रपट 11 ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटातून गँगस्टर ड्रामा, भावना, सूड आणि नात्यांमधील गुंतागुंतीची कहाणी पडद्यावर आणली जाईल.

रणबीर कपूर सध्या त्याच्या ब्रह्मास्त्र या चित्रपटात व्यस्त आहे, ज्याचे शूटिंग आज संपले आहे. याशिवाय रश्मिका मंदाना काही साऊथ चित्रपटांसह बॉलिवूडच्या गुडबॉय, मिशन मजनू या चित्रपटांवर काम करत आहे. यामुळे रश्मिका आता लवकरच बॉलिवूडमध्ये दहशत निर्माण करण्याच्या तयारीत आहे. लवकरचं या चित्रपटांची रिलीज डेट फायनल होईल.