घरताज्या घडामोडीऋषी कपूर यांच्या 'या' ट्विटमुळे पाकिस्तानी खेळाडूंना झाला होता आनंद

ऋषी कपूर यांच्या ‘या’ ट्विटमुळे पाकिस्तानी खेळाडूंना झाला होता आनंद

Subscribe

ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर हे सोशल मीडियावर फार अॅक्टिव्ह असायचे. सोशल मीडियावर ऋषी कपूर आपले परखड मत मांडायचे. अनेक वेळा सोशल मीडियावर केलेल्या वक्तव्यामुळे ते चर्चेत देखील आले आहेत. ऋषी कपूर यांनी एकदा पाकिस्तानी क्रिकेटपटूंची बाजू घेणारे ट्विट केले होते. त्यावेळी हे ट्विट तुफान व्हायरल झाले होते. भारतातील ऋषी कपूर पहिले सेलिब्रिटी होते ज्यांनी या प्रकरणावर परखड मत व्यक्त केले होते. त्यामुळे पाकिस्तानाच्या क्रिकेटपटूंनी देखील त्याचे आभार मानाले होते.

पाकिस्तानी क्रिकेटपटूंना खुश करणारे हे होते ट्विट?

ऋषी कपूर म्हणाले होते की, ‘आपल्याला आयपीएलमुळे खूप चांगले खेळाडू मिळाले आहेत. अफगाणिस्तान सारखी टीम आयपीएलचीच देण आहे. त्यामुळे पाकिस्तानी खेळाडूंना देखील आयपीएलमध्ये खेळण्याची संधी द्यावी. मग होईल खरा सामना.’

- Advertisement -

- Advertisement -

ऋषी कपूर याचे शेवटचे ट्विट

ऋषी कपूर यांनी शेवटचे ट्विट २ एप्रिलला केले होते. ऋषी कपूर यांनी लॉकडाऊन दरम्यान पोलिस आणि डॉक्टारांवर होणाऱ्या हल्ल्याचा निषेध केला होता. हल्ला करणाऱ्यांना ऋषी कपूर यांनी चांगलेच सुनावले होते. आपण कोरोना विरूद्ध लढाई जिंकुयात असे ते शेवटच्या ट्विटमध्ये म्हणाले होते.


हेही वाचा – Video: दोन हरहुन्नरी अभिनेत्यांच्या ‘डी-डे’ चित्रपटातला सीन झाला व्हायरल


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -