फोटोफ्रेम घेऊन आलेल्या फॅनकडे सलमानचे दुर्लक्ष; दबंग खान सोशल मीडियावर ट्रोल

मुंबई विमानतळावर सलमान खानने त्याच्या फॅन्सकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे तो सोशल मीडियावर ट्रोल होत आहे.

बॉलिवूडचा दबंग खान म्हणजेच सलमान खान (Salman Khan) आपल्या अॅटीड्युडमुळे नेहमीच चर्चेत असतो. त्याला भेटायला येणाऱ्या फॅन्ससोबतही (Fans) त्याचे अनेकदा खटके उडतात. त्याच्या बॉडीगार्डकडूनही (Bodyguard) फॅन्सना अनेकदा धक्काबुक्की होते. तो हल्ली आपल्या फॅन्सना चांगली वर्तवणूक देत नसल्याचेही अनेकदा समोर आले आहे. असाच एक प्रकार मुंबई विमानतळावर (Mumbai Airport) घडला. यामुळे सलमान खानचे फॅन्स त्याच्यावर नाराज झाले आहेत.

IIFA 2022 साठी आबुधाबीला जाण्यासाठी सलमान खान मुंबई विमानतळावर आला होता. सलमान गाडीतून उतरताच त्याचा एक फॅन फोटोफ्रेम घेऊन त्याच्या दिशेने धावत गेला. सुरुवातीला सलमान खानने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. त्यानंतर त्याच्या फॅन्सने त्याला पुन्हा भेटण्याचा प्रयत्न केला. तेव्हाही सलमान खानने त्याला फारसं महत्त्व दिलं नाही. फॅन्सने आणलेल्या फोटोफ्रेमकडेही त्याने पाहिलं नाही. शिवाय त्याच्या चेहऱ्यावर अत्यंत त्रासलेले हावभाव होते. त्यामुळे नेटीझेन्सनेही त्याच्यावर नाराजी व्यक्त केली. त्याच्या या वागण्यावर अनेकांनी टीका केली. अशाप्रकरचा अॅटीट्युड चांगला नसल्याचेही अनेकांनी कॉमेन्टमध्ये म्हटलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

सलमान खान आपल्या चाहत्यांसोबत कधीकधी अत्यंत वाईट वागत असला तरीही त्याच्या आगामी चित्रपटांकडे साऱ्यांचे लक्ष असते. येत्या काळात सलमान खान आणि कटरिना कैफ पुन्हा एकत्र दिसणार आहेत. टायगर ३ साठी ते पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत. याशिवाय,  एन्ट्री २ आणि किक २ च्या चित्रिकरणातही तो व्यस्त असल्याचे समोर आले आहे.