भाईजानच्या ‘या’ जॅकेटची किंमत ऐकून तुम्ही व्हाल थक्क!

bollywood salman khan film radhey jacket price will shock you check here one jacket price
भाईजानच्या 'या' जॅकेटची किंमत ऐकून तुम्ही व्हाल थक्क!

कोरोनाच्या काळात सर्व कलाकार आपल्या कामापासून दूर राहिले होते. पण आता हळूहळू कामाला सुरुवात झाली आहे. यामध्ये सलमान खानचे नावही जोडले गेले आहे. सलमानच्या आगामी ‘राधे द मोस्ट वांटेड’च्या चित्रपटाच्या शूटिंग सुरू झाली आहे. नुकताच सलमान खानने फोटो शेअर करून शूटिंगच्या सुरुवात झाल्याची माहिती दिली आहे. या फोटोमध्ये सलमानची बॅक पोज असून तो बाइक रायडरच्या लूकमध्ये दिसत आहे.

या फोटोमध्ये सलमानने ब्लॅक कलरचे जॅकेट घातले आहे. या जॅकेटची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. या जॅकेटची कंपनी आणि किंमत याबाबत तर्क वितर्क लावले जात आहे. तुम्हालाही या जॅकेटची किंमत जाणून घेण्याची इच्छा नक्की होत असेल. तर मग जाणून घ्या.

View this post on Instagram

Back to shoot after 6 1/2 months … feels good #Radhe

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan) on

हे जॅकेट ‘डस्ट ऑफ गॉड’ कंपनीचे आहे. माहितीनुसार, या जॅकेटच्या किंमतीतबद्दल बोलायचे झाले तर भारतीय चलनानुसार या जॅकेटची किंमत १ लाख २८ हजार रुपये आहे. या कंपनीचे जॅकेट खास करून सेलिब्रिटी वापरतात. शाहरुख खान, विक्की कौशल अशा अनेक सेलिब्रिंटींनी या कंपनीचे जॅकेट वापरले आहेत. सलमान खानने हा फोटो शेअर करताना लिहिले आहे की, ‘६ महिन्यांनंतर शूटिंगवर परतलो. छान वाटत आहे.’ सलमान या फोटोवर चाहत्यांनी खूप साऱ्या कमेंट केल्या आहेत.


हेही वाचा – सिंघम गर्ल ‘या’ उद्योगपतीसोबत लग्नाच्या बंधनात अडकणार