घरताज्या घडामोडीViral Video: भाईजानचा सर्वांसमोर युलियाने केला अपमान, युजर्स म्हणाले 'भाभी आज नाराज...

Viral Video: भाईजानचा सर्वांसमोर युलियाने केला अपमान, युजर्स म्हणाले ‘भाभी आज नाराज है’

Subscribe

बॉलिवूडचा भाईजान नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतो. कालचा दिवस भाईजानसाठी खूप महत्त्वाचा होता. कारण काल सलमानचा आगामी चित्रपट ‘अंतिम’चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आलाय. तसेच काल सलमानच्या बहिणीचा नवरा आयुष शर्माच्या बर्थडे पार्टी होती. ज्यात फिल्म इंडस्ट्रीचे अनेक सेलिब्रिटी आले होते. पण या पार्टीत असे काही झाले, ज्यामुळे सलमान खान रागात दिसला.

आयुषच्या बर्थडे पार्टीला सलमान खान आपली रुमर्ड गर्लफ्रेंड युलिया वंतूरसोबत पोहोचला होता. यादरम्यान दोघे एकाच रंगाच्या आउडफिटमध्ये दिसले होते. सलमान खान ब्लॅक जिन्स, ब्लॅक जॅकेट आणि शर्टमध्ये दिसला तर युलिया ब्लॅक स्कर्ट आणि टॉपमध्ये दिसली. परंतु युलियाने सर्वांसमोर असे काही केले की, सलमान खानला ते अजिबात आवडले नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

- Advertisement -

दरम्यान सलमान आणि युलिया एका गाडीतून उतरल्यानंतर त्यांचा फोटो काढण्यासाठी सर्व पापराझी जमले होते. यादरम्यान पापराझीसमोर पोझ देण्यासाठी सलमान खान थांबला, पण युलियाने सलमानकडे ढुंकूनही पाहिले नाही. युलिया पापाराझी समोर गाडीतून उतरून सर्वांकडे दुर्लक्ष करून पार्टीला निघून गेली. सलमान खान बराच वेळ तिला पाहत राहिला, पण ती काही थांबली नाही. हा सलमान खानचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये सलमान रागात दिसत आहे. पण सलमान यावेळेस काहीच बोलला नाही, तो गुपचूप आतमध्ये गेला. हे पाहून अनेक वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जात आहेत. काही युजर म्हणतायत की, ‘भाभी आज नाराज है.’ तर काही युजर हा सलमानचा अपमान असल्याचे बोलत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bollywood Pap (@bollywoodpap)

- Advertisement -

हेही वाचा – Shahrukh Khan जेव्हा दुःखी असतो, तेव्हा मन्नतच्या गच्चीवर जाऊन….


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -