Saturday, February 27, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी शाहीद कपूरच्या पत्नीचा 'हा' क्रिकेटर आहे क्रश

शाहीद कपूरच्या पत्नीचा ‘हा’ क्रिकेटर आहे क्रश

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेत्री शाहीद कपूरची पत्नी मीरा राजपूत नेहमी सोशल मीडियावर खूप सक्रीय असते. नुकतच तिने इन्स्टाग्रामवर अकाउंटवरून प्रश्न-उत्तराचे सेशन केले होते. यादरम्यान मीराला अनेक मजेशीर प्रश्न विचारण्यात आले आणि तिने त्याचे उत्तरही दिले. मीरा राजपूतने आपल्या क्रशपासून डोक्याला लागलेल्या दुखापतीच्या निशाण्यापर्यंतचे सर्व काही सीक्रेट गोष्टी चाहत्यांसोबत शेअर केल्या आहेत. मीरा राजपूतला जेव्हा तिच्या क्रशबाबत विचारले तेव्हा तिने साऊथ आफ्रिका आणि आयपीएलमध्ये आरसीबीसाठी खेळणारा क्रिकेटर एबी डी विलियर्सचे नाव घेतले. मीरा राजपूत म्हणाली की, ‘मला तो खूप आवडतो.’

मीराच्या डोक्यावर एक छोटस निशाण आहे. जेव्हा याबाबत विचारले तेव्हा मीरा म्हणाली की, ‘मी तीन वर्षांची होती. सर्व मुलांप्रमाणे मी बेडवर उड्या मारत होती. तेव्हा पडली आणि बेडचा कोना लागला आणि हे तेच निशाण आहे.’

- Advertisement -

बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल म्हणजे शाहीद कपूर आणि मीरा कपूर. खरतर मीरा ही सामान्य घरातील मुलगी आहे. पण तिच्या स्टाईल स्टेमेंटमुळे ती नेहमी चर्चेत असते. इतर अभिनेत्रींप्रमाणेच मीराचेही फोटोची सोशल मीडियावर नेहमी चर्चा असते. २०१५ साली मीरा राजपूत आणि शाहीद कपूरचे लग्न झाले होते. २६ वर्षीय मीरा दिल्लीतील राहणारी आहे. शाहीद आणि मीराला दोन मुलं आहेत. मुलीचे नाव मीशा कपूर तर मुलाचे जैन कपूर आहे. मीरा आणि शाहीद कपूरमध्ये १३ वर्षांचे अंतर आहे.


हेही वाचा – नव्या गाण्यात हुक्का पिताना दिसली प्रिया वॉरियर, डान्स पाहून चाहते झाले घायाळ


- Advertisement -

 

- Advertisement -