‘आता मला डान्स क्लासची गरज नाही’, सासूच्या नृत्यावर प्रभावित होत शाहरुख खानची प्रतिक्रिया

bollywood shahrukh khan react on his mother in law dance video says i need to learn dancing from her
आता मला डान्स क्लासची गरज नाही, सासूच्या नृत्यावर प्रभावित होत शाहरुख खानची प्रतिक्रिया

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची पत्नी गौरी खान सोशल मीडियावर अधिक सक्रिय असते. गौरी अनेकदा तिच्या इन्स्टाग्रामवर अकाउंवर कुटुंबियांसोबतचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.अलीकडेच गौरीने तिच्या इन्स्टाग्रामवर तिच्या आईचा एक व्हिडिओ शेअर केलाय जो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये गौरीची आई खूप मस्त डान्स करताना दिसतेय. गौरीने आईच्या डान्सचा व्हिडिओ शेअर कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘इथे कोणीही तुमच्या डान्स स्टेप्स मॅच करु शकत नाही’. गौरीच्या आईचा हा व्हिडिओ इंटरनेटवर खूप व्हायरल होत असून अनेकांच्या पसंतीस उतरत आहे.

आता हा व्हिडिओ किंग खान शाहरुख खाननेही आपल्या सोशल मीडिया अकाऊंट शेअर केला आहे. ज्यात त्याने सासू-सासऱ्यांकडून डान्स क्लास घेण्याची इच्छा व्यक्त करुन दाखवली आहे. शाहरुखने गौरीच्या पोस्टवरही कमेंट करत म्हटले की, त्याला सासूबाईकडून डान्स क्लास शिकण्याची इच्छा आहे. यानंतर, किंग खानने आपल्या ट्विटरवरही हा व्हिडिओ शेअर करत लिहिले की, ‘हम्म्मम सासूबाईंकडून डान्स क्लास घेण्याची गरज आहे’.

गौरीच्या व्हिडिओवर कमेंट करताना अनेक सेलेब्सनी तिच्या आईच्या नृत्याचे कौतुक केले. चित्रपट दिग्दर्शक एकता कपूरने लिहिले की, ‘वाह किलर’… याशिवाय फरहान अख्तर, चंकी पांडे, पत्नी भावना पांडे, महीप कपूर, मनीष मल्होत्रा, अमृता अरोरासह अनेकांनी गौरीच्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्यात. ९ सप्टेंबरला गौरीने तिच्या इन्स्टाग्रामवर आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना हा व्हिडिओ शेअर केला.

लग्नपूर्वी गौरी खानला गौरी छिब्बर या नावाने ओळखले जायचे. गौरी एका सैनिकी कुटुंबात जन्मलेली मुलगी आहे. मात्र शाहरुख आणि गौरीची प्रेमकथाही खूप रंजक आहे. भिन्न धर्माचे असल्याने पूर्वी कुटुंबातील सदस्य या लग्नासाठी तयार नव्हते. नंतर शाहरुख मुंबईत आला आणि इथल्या सिरियलमध्ये काम करत त्याने चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले. १९९२ मध्ये ‘दीवाना’ या पहिल्या चित्रपटानंतर शाहरुखने मागे वळून पाहिले नाही. मात्र, शाहरुख आणि गौरी यांच्यातील प्रेमापोटी कुटुंबातील सदस्यांना नमते घ्यावे लागले आणि दोघांनी लग्न केले.


ganesh chaturthi 2021 : बेकरी व्यावसायिकाने साकारला इको फ्रेंडली चॉकलेट बाप्पा, पाहण्यासाठी भाविकांची गर्दी