घरमनोरंजनsidharth malhotra आणि kiara advani चं ब्रेकअप! दोघांच्या इन्स्टा पोस्टची चाहत्यांमध्ये चर्चा

sidharth malhotra आणि kiara advani चं ब्रेकअप! दोघांच्या इन्स्टा पोस्टची चाहत्यांमध्ये चर्चा

Subscribe

बॉलीवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा ​याने ‘शेरशाह’ या चित्रपटातील आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणीमध्ये प्रेमसंबंध सुरु झाल्याची चर्चा सुरु आहे. दोघांनी हे नाते अद्याप अधिकृतरित्या मान्य केले नाही. पण चाहत्यांमध्ये त्यांच्या अफेअपची खूप दिवसांपासू चर्चा होती. आता कियारा आणि सिद्धार्थच्या नात्यात दुरावा आल्याचे बोलले जात आहे. दोघांनी एकमेकांना भेटणे आणि बोलणे बंद केले आहे. अशातच दोघांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमुळे चाहतेही अस्वस्थ झाले आहेत.

सिद्धार्थ मल्होत्राने इंस्टाग्रामवर स्वत:चा एक फोटो शेअर केला असून या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्याने स्टीव्ह मार्टिनचा एक कोट लिहिला आहे. प्रकाश नसलेला दिवस एका कोळख्या रात्रीप्रमाणेच असतो. सिद्धार्थच्या फोटोच्या कॅप्शनवरून अंदाज लावले जात आहेत की,तो ‘सनशाईन’ कियारा अडवाणीला तर मिस करत नाही ना?. तर दुसरीकडे कियारा अडणवाणीने देखील स्वत;चा एक सुंदर फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती फुलांकडे बघत नसताना दिसतेय. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलेय की, स्मित पसरवा, हास्यासाठी प्रोत्साहन द्या आणि प्रेम निर्माण करा. दोघांच्या या पोस्टवरून त्यांच्यात ब्रेकअप झाल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. अनेक यूजर्स फोटोवर कमेंट करत कियाराला वेगळे होण्यामागचे कारण विचारत आहेत. दुसरीकडे, अनेकांनी तिच्या जबरदस्त स्टायलिश लूकचे कौतुकही केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sidharth Malhotra (@sidmalhotra)

- Advertisement -

सिद्धार्थ मल्होत्रा ​आणि कियारा अडवाणी यांची ‘शेरशाह’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान भेट झाली होती. त्यानंतर दोघेही लंच डेटपासून ते व्हेकेशनपर्यंत एकत्र दिसले. मात्र या पोस्टवरून सिद्धार्थ आणि कियारा वेगळे झाले असल्याची चर्चा सुरु आहे. तसेच दोघे डेटींगवरही एकत्र दिसले नाही. मात्र सिद्धार्थ आणि कियाराने लिंकअप आणि ब्रेकअपच्या बातम्यांवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)

- Advertisement -

नवनीत राणा : ‘मॉडेल, अभिनेत्री ते खासदार’

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -