Sunday, April 11, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन सिंगर बप्पी लहरी यांना कोरोनाची लागण

सिंगर बप्पी लहरी यांना कोरोनाची लागण

मुबंईतील ब्रीच कॅंडी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले असल्याची माहिती त्यांची मुलगी रिमा लहरी हीने दिली आहे.

Related Story

- Advertisement -

सुप्रसिद्ध बॅालिवूड सिंगर बप्पी लहरी यांना कोरोनाची लागण झाली आहे. मुंबईतील ब्रीच कॅंडी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले असल्याची माहिती त्यांची मुलगी रिमा लहरी हीने दिली आहे. कोरोना होऊ नये म्हणून बप्पीदा यांनी बरीच सावधानता बाळगली होती. पण त्यांच्यात कोविड १९ चे लक्षण आढळून आले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॅा.उदवडिया यांच्या देखरेखीखाली बप्पीदांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, बप्पीदांच्या संर्पकात आलेल्या लोकांनी कोरोना चाचणी करावी असे आवाहन रिमाने केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bappi Lahiri (@bappilahiri_official_)

- Advertisement -

बप्पी लहरी यांनी आपल्या करियरची सुरुवात १९७२ मध्ये ‘दादू’ या बंगाली चित्रपटाद्वारे केली. १९७६ मध्ये ताहिर हुसेन यांच्या’जखमी’ या चित्रपटाद्वारे त्यांनी बॅालिवूड मध्ये पदार्पण केलं होते. अनेक सुपरहिट गाणी बप्पीदां यांनी गायली आहे. बप्पीदां यांना सोनं घालणं आवडतं. यामुळे त्यांच्या गळ्यात, हातात नेहमी जाड अश्या सोनाच्या अंगठ्या ,चैन असतात. त्यांच्या आगळ्या वेगळ्या पेहरावामुळे देखील त्यांची एक वेगळी ओळख बॅालिवूड मध्ये निर्माण झाली आहे.

जगभरामध्ये कोरोनाचा प्रसार पुन्हा वेगाने होत आहे. लसीकरणाला सुरुवात झाली असली तरी अनेक ठिकाणी कोरोनाच्या दूसऱ्या लाटेचा शिरकाव झाला आहे. बॅालिवूडमधील अनेक कलाकार देखील कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. काही दिवसांपूर्वी अभिनेता रणबीर कपूर, कार्तिक आर्यन,आमीर खान यांचा कोरोना रिर्पोट पॅाझिटिव्ह आला होता.

- Advertisement -

हे वाचा- कतरिनाची बहिण इसाबेल गिरवतेय हिंदीचे धडे

- Advertisement -