घरताज्या घडामोडीनेहा कक्करची वहिनी होणार 'ही' बिग बॉस फेम अभिनेत्री!

नेहा कक्करची वहिनी होणार ‘ही’ बिग बॉस फेम अभिनेत्री!

Subscribe

बॉलिवूडची लोकप्रिय गायिका नेहा कक्कर २४ ऑक्टोबर २०२० साली पंजाबी गायक रोहनप्रित सिंहसोबत लग्नबंधनात अडकली. नेहा कक्करचे अजूनही लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यादरम्यान नेहा कक्करचा भाऊ टोनी कक्कर संदर्भात एक मोठा खुलासा झाला आहे. माध्यमाच्या वृत्तानुसार, नेहाचा भाऊ टोनी कक्कर बिग बॉस सीझन १४ फेम अभिनेत्री निक्की तांबोळीला डेट करत असल्याचे समोर आले आहे. पण या माहितीला अजूनही टोनी किंवा निक्कीने दुजोरा दिलेला नाही आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nikki Tamboli (@nikki_tamboli)

बिग बॉस सीझन १४ मध्ये निक्की तांबोळीने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. बिग बॉसचा शो झाल्यानंतर अलीकडेच तिचा एक म्युझिक व्हिडिओ प्रदर्शित झाला होता. या व्हिडिओमुळे निक्की तांबोळी खूप चर्चेत आली आहे. माहितीनुसार, निक्की तांबोळी टोनी कक्करवर इम्प्रेस्ड झाली आहे. नुकतेच तिने टोनी कक्करच्या एका फोटोवर प्रतिक्रिया दिली होती. तिने लिहिले होते की, ‘इतका क्यूट का आहेस?’ टोनी आणि निक्की सध्या याच संभाषणामुळे दोघे एकमेकांच्या जवळ येऊ इच्छित असल्याचे दिसत आहे आणि ते एकमेकांना पसंत करू लागले आहेत. निक्की टोनीच्या अनेक गाण्यावर नाचताना दिसली आहे. माहितीनुसार, सध्या टोनी आणि निक्की एकमेकांसोबत वेळ घालवत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tony Kakkar (@tonykakkar)

- Advertisement -

टोनी आणि निक्की गपचूप भेटत असल्याचे देखील समोर आले आहे. परंतु आता हे नवे कपल आपल्या रिलेशनशिप बाबत लवकरच खुलासा करणार असल्याचे म्हटले जात आहे. टोनी आणि निक्कीचा आतापर्यंतचा प्रवास खूप दमदार आहे. टोनीची अनेक गाणी हिट झाली आहेत, तर निक्कीने आपल्या अभिनयाने एक वेगळीच छाप पाडली आहे.


हेही वाचा – Birthday Special: मिका सिंगच्या गाण्यातील स्मृती इराणींना ओळखलत का?

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -