घरमनोरंजनबॉलिवूड गाणी इन्स्टाग्राम रील्ससारखी...; 'बेशरम रंग' गाण्यावर विवेक अग्निहोत्रींची टीका

बॉलिवूड गाणी इन्स्टाग्राम रील्ससारखी…; ‘बेशरम रंग’ गाण्यावर विवेक अग्निहोत्रींची टीका

Subscribe

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान जवळपास 4 वर्षानंतर चित्रपटामध्ये झळकताना दिसणार आहे. शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी चित्रपटांमुळे चर्चेत आहे. 2018 मधील ‘जीरो’ चित्रपटानंतर शाहरुख बॉलिवूडमध्ये पुन्हा धमाकेदार कमबॅक करत आहे. 25 जानेवारी 2023 मध्ये शाहरुखचा बहुचर्चित ‘पठाण’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करत असून शाहरुख व्यक्तिरिक्त दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम देखील मुख्य भूमिकेत दिसतील. जॉन अब्राहम चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसेल. दरम्यान, नुकत्याच एक-दोन दिवसांपूर्वी या चित्रपटातील ‘बेशरम रंग’ हे पहिलं गाणं प्रदर्शित करण्यात आलं होतं. जे सध्या प्रचंड चर्चेत आहे.

या गाण्याला सोशल मीडियावर अनेकांना उत्तम प्रतिसाद दिला, तर काहींना गाण्यातील बोल्ड सीन्समुळे चित्रपटाला ट्रोल करायला सुरुवात केली. अशातच आता या गाण्यावर दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींनी देखील टिका केली आहे.

- Advertisement -

विवेक अग्निहोत्रींनी त्यांच्या ट्वीटर अकाऊंटवरुन नाव न घेता निशाना साधला आहे. त्यात त्यांनी लिहिलंय की, “आधी इंस्टाग्राम रिल्स बॉलिवूड गाणी घाणेरड्या पद्धतीने कॉपी करत होते आणि आता बॉलिवूड गाणी इंस्टाग्राम रिल्सची घाणेरडी पद्धत कॉपी करत आहेत.”

शाहरुखच्या चाहत्यांची विवेक अग्निहोत्रींवर टीका

- Advertisement -

विवेक अग्निहोत्रींच हे ट्वीट सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. हे पाहून शाहरुखच्या चाहत्यांनी देखील विवेक अग्निहोत्रींवर टीका केली आहे. काहीजण त्यांच्या जुन्या चित्रपटांचे स्क्रिनशॉट शेअर करत आहेत. ज्यामध्ये त्यात सरळ सरळ बोल्ड सीन्स दाखवले आहेत.

 


हेही वाचा :

शूटिंगदरम्यान राजपाल यादवने विद्यार्थ्याला मारली धडक; पोलिसांत तक्रार दाखल

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -