घरमनोरंजनभारतातील भव्य मोहिमेत बॉलिवूडचे बडे स्टार्स सामील

भारतातील भव्य मोहिमेत बॉलिवूडचे बडे स्टार्स सामील

Subscribe

बॉलिवूडकर 'ड्रग फ्री इंडिया' या भारतातील सध्याच्या सगळ्यात भव्य आणि महत्त्वाच्या मोहिमेत आध्यात्मिक गुरु श्री श्री रवी शंकर यांसह सामील झाले आहेत.

कतरीना कैफ, आमिर खान, टायगर श्रॉफ, वरुण धवन, विकी कौशल, आयुषमान खुराना, संजय दत्त, कपिल शर्मा, अर्जुन कपूर, सोनाक्षी सिन्हा, बादशाह, परिणीती चोप्रा, शिल्पा शेट्टी, करण जोहर, क्रिती सॅनन, एकता कपूर, रितेश सिधवानी असे अनेक बॉलिवूडकर ‘ड्रग फ्री इंडिया’ या भारतातील सध्याच्या सगळ्यात भव्य आणि महत्त्वाच्या मोहिमेत आध्यात्मिक गुरु श्री श्री रवी शंकर यांच्यासह सामील झाले आहेत.

अमली पदार्थांचा बदला घेण्याचा हा माझा मार्ग आहे.
– संजय दत्त, अभिनेता 

- Advertisement -

भारताच्या लोकसंख्येत तरुणाईचा सगळ्यात मोठा वाटा आहे. आणि आजच्या तरुण पिढीचा सर्वात मोठा शत्रू अमली पदार्थ आहेत. याविरुद्ध लढा देण्यासाठी मी तयार आहे. 
– वरूण धवन, अभिनेता 

बॉलिवूडमधील माझा मित्रपरिवार या गरजेच्या मोहिमेत मनापासून सहभाग दाखवत असल्याचा मला आनंद आहे. ड्रग अब्युजविरुद्धचा लढा जिंकण्यासाठी ड्रग फ्री इंडिया ही भारतातील सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची मोहीम आहे.
– महावीर जैन, 

- Advertisement -

ही मोहिम हरियाणात लाँच होणार 

ही राष्ट्रव्यापी मोहीम १८ फेब्रुवारीला पंजाब तर १९ फेब्रुवारीला हरियाणा येथे लाँच होणार आहे. दोन्ही दिवशी अंदाजे ६० हजार विद्यार्थ्यांचा या मोहिमेत सक्रिय सहभाग असणार आहे. इतकेच नाही तर देशभरातील हजारोंच्या संख्येतील विद्यार्थी लाईव्ह ब्रॉडकास्टच्या माध्यमातून यात सामील होतील. हे सर्व विद्यार्थी आणि इतर लक्षावधी लोक अमली पदार्थांच्या सेवनाविरुद्ध प्रतिज्ञा घेणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -