नववर्षाची धूम, सेलिब्रेटी झूम

बॉलिवूड सेलिब्रिटींनी नववर्षाचे स्वागत कसे केले ते पाहा..

bollywood stars partying new years
नववर्षाची धूम, सेलिब्रेटी झूम

बॉलिवूड सेलिब्रिटींनी २०२१ चे मोठ्या जल्लोषात स्वागत केले. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी आपल्या कुटुंबियासह भारतात राहूनच नव वर्षाचा आनंद साजरा करताना दिसले, तर दुसरीकडे अनेक सेलिब्रिटी परदेशात जाऊन नववर्षाचा जल्लोष करत आहेत. अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, सारा अली खान, मलायका अरोरा, अनन्या पांडे, सुनिल शेट्टी, ईशान खट्टर, मनिष मल्होत्रा, सारा अली खान, करिना कपूर, सैफ अली खान, यांच्यासमवेत अन्य सेलिब्रिटींजने देखील नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. बॉलिवूड सेलिब्रिटींनी नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनचे अनेक फोटो सध्या त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत. फोटो शेअर करताना प्रत्येकाने त्यांच्या चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अमिताभ बच्चन यांनी आपल्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ते एकदम मस्त लूकमध्ये दिसत आहेत. त्यामध्ये त्यांनी स्टाइलिश चष्मा आणि डोक्यावर टोपी घातलेली दिसत आहे. हा फोटो शेअर करताना अमिताभ यांनी चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. ऐश्वर्या बच्चन हिने देखील कुटुंबासोबत २०२१चे स्वागत केले. तिने एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये अमिताभ आपल्या कूल लूकमध्ये असून जया बच्चन, अभिषेक बच्चन आणि आराध्या बच्चन फोटोमध्ये दिसत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

करिना कपूरने मुलगा तैमूर व पती सैफ अली खानसोबत असे सेलिब्रेट करत नववर्षाचे स्वागत केले.

तर दुसरीकडे सारा अली खानने नववर्षानिमित्त तिच्या भावासोबतचा फोटो इस्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले ‘ भावासोबत नवीन वर्ष साजरे करणे नेहमीच मजेदार आहे. तो माझा सर्व भीती दूर करतो’.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95)

ट्विंकल खन्नाने अक्षय कुमारसोबत नवीन वर्षे साजरे केले. अक्षयसोबतचा फोटो शेअर करत तिने चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Twinkle Khanna (@twinklerkhanna)

मलायका अरोरा सध्या न्यू ईअर सेलिब्रेशनसाठी गोव्यात आहे. पहिल्यांदाच ती अर्जुन कपूर आणि फॅमिलीसोबत एकत्र फिरायला गेली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

तर आलिया भट आणि रणबीर कूपर आणि फॅमिली नीतू कपूर, रणबीरची बहीण रिद्धिमा, मित्र अयान मुखर्जी इतकेच नाही तर दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग असे सगळेच सध्या राजस्थानातील रणथंबोर येथे मज्जामस्ती करत नव वर्षाचे स्वागत करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ranbir kapoor 🔵 (@ranbir_kapoooor)

 

View this post on Instagram

 

A post shared by Alia Bhatt ☀️ (@aliaabhatt)


हेही वाचा – Ohh! दीपिकाने फेसबुक, इंस्टा, ट्विटरवरून Delete केल्या सर्व पोस्ट!