शाहरुख, सलमान आणि अक्षयची सौदी अरबच्या मंत्र्यांना भेट, काय आहे कारण?

बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खानच्या चार्मिंग अंदाजावर प्रत्येकजण घायाळ आहे. अलीकडेच शाहरुखच्या मन्नतवर अनेक दिग्गज व्यक्ती पोहोचले होते. सलमान खान, अक्षय कुमार आणि सैफ अली खानसारख्या बीटाऊनच्या मोठ्या सुपरस्टार व्यतिरिक्त शाहरुखच्या घरी काही खास पाहुणे उपस्थित होते. ज्यांच्यासोबत बॉलिवूडच्या कलाकारांचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

दरम्यान सौदी अरब रेड सी फिल्म फेस्टिव्हलचे चेअरमन मोहम्मद अल तुर्की आणि इतर पाहुण्याचे स्वागत शाहरुख खानने जंगी पद्धतीने केले. अल तुर्की यांनी आपल्या सोशल मीडियावर शाहरुख खानसोबत फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत अल तुर्की यांनी चाहत्यांना रमजानच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी लिहिले की, भारतातून माझा भाऊ शाहरुख खानसोबत रमजानच्या शुभेच्छा.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mohammed Al Turki (@moalturki)

सौदी अरबचे सांस्कृतिक मंत्री बदर बिन फरहान असलौद यांनीही बॉलिवूडच्या सुपरस्टार्ससोबतच्या भेटीचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. मंत्रींनी शाहरुख खान, अक्षय कुमार, सैफ अली खान आणि सलमान खानसोबतचे फोटे शेअर केले आहेत. फोटोमध्ये सर्व लोकं एकमेकांसोबत टाईम एन्जॉय करताना दिसत आहे. सौदी अरबच्या मंत्र्यांसोबत बॉलिवूडच्या सुपरस्टार्सचे फोटो सध्या चांगलेच चर्चेचा विषय बनले आहेत.

माहितीनुसार, नुकताच शाहरुख खान ‘पठाण’ चित्रपटाच्या स्पेनमधील शूटिंगहून परतला आहे. शाहरुख खानचा हा बहुप्रतिक्षित चित्रपट पुढच्या वर्षी जानेवारी २०२३मध्ये चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात शाहरुखसोबत दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.


हेही वाचा – Malaika Arora: कार अपघातानंतर मलायकाला मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज