घरताज्या घडामोडीHappy Birthday Sunil Shetty: अभिनेत्याबरोबरच उत्तम बिझनेसमन!

Happy Birthday Sunil Shetty: अभिनेत्याबरोबरच उत्तम बिझनेसमन!

Subscribe

सुपरस्टार सुनील शेट्टी यांचा आज वाढदिवस आहे. सुनील शेट्टी अशा कलाकारांपैकी एक आहे जे केवळ त्यांच्या चित्रपटांमुळेच नाही तर त्यांच्या व्यवसायामुळे देखील ओळखले जातात. एक यशस्वी अभिनेता तसेच यशस्वी उद्योजक म्हणून सुनील शेट्टी प्रसिद्ध आहेत. सुनील शेट्टी यांनी १०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कारकिर्दीवर एक नजर टाकूयात

- Advertisement -

सुनील शेट्टी यांचा जन्म कर्नाटकच्या मँगलोरमध्ये झाला आणि १९९२ मध्ये त्यांनी ‘बलवान’ चित्रपटाद्वारे फिल्मी करिअरची सुरुवात केली. सुनील शेट्टी यांनी कारकीर्दीत त्यांनी विनोदी ते अ‍ॅक्शनपर्यंत अनेक चित्रपट केले. पण त्यांचे विनोदी चित्रपट मोठ्या प्रमाणावर गाजले. पण १०० चित्रपटांमध्ये काम केलेल्या या अभिनेत्याला कधीच अभिनेता व्हायचे नव्हतं तर त्यांना  क्रिकेटपटू व्हायचे होतं. त्यामुळे खेळाडू होण्यासाठी फिटनेसकडे त्यांनी लक्ष दिलं.

- Advertisement -

चित्रपटांबरोबरच ते एक उत्तम व्यवसायिक म्हणून ओळखले जातात. त्यांच्याकडे बरीच रेस्टॉरंट्स, क्लब आहेत आणि त्याचबरोबर ते अ‍ॅडव्हेंचर पार्कचे सह-मालक देखील आहे. रेस्टॉरंट्सबरोबर त्याने रिअल इस्टेटमध्येही मोठी गुंतवणूक केली आहे. त्यांनी मुंबईजवळ खंडाळ्यामध्ये अनेक घरे बांधली आहेत. त्यांना प्रॉपर्टी खरेदीमध्ये खूप इंट्रेस्ट आहे.

View this post on Instagram

MUSSOORIE MOODS 😊♥️ #Mussoorie #TheQueenOfHills

A post shared by Suniel Shetty (@suniel.shetty) on

एका मुलाखतीत बोलताना त्यांनी सांगितलं होतं की, त्यांना हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेतलं आहे. त्याजबरोबर बिझनेसचाही अभ्यास केला आहे. त्यानंतर हॉटेल व्यवसाय सुरू केल्यानंतर त्यांचे लक्ष रिअल इस्टेटवर होते. त्यांनी दक्षिण भागातही आपला व्यवसाय वाढविला असून त्याचा प्रकल्पही मुंबई-गोव्यात आहे. याशिवाय त्याचे स्वतःचे प्रोडक्शन हाऊस ‘पॉपकॉर्न एंटरटेनमेंट’ आहे. त्यांच्याकडे स्वत: चे बुटीक आहे.

त्यांच्या कमाईविषयी कोणतीही अधिकृत माहिती नाही, परंतु असे म्हटले जाते की ते वर्षाला १०० कोटींपेक्षा जास्त कमावतात. तसेच त्याची पत्नी या व्यवसायात तज्ञ आहे आणि जीवनशैली स्टोअर ते रिअल इस्टेट व्यवसायासह अनेक ठिकाणी गुंतवणूक केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -