Ranveer Singh NBA Brand Ambassador : रणवीर सिंग ‘बास्केटबॉल असोसिएशन’चा अँबेसेडर

Bollywood superstar Ranveer Singh named NBA's brand ambassador for India
Ranveer Singh NBA Brand Ambassador :रणवीर सिंह भारताच्या 'बास्केटबॉल असोसिएशन'चा ब्रँड अँबेसेडर

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग सध्या सर्वाधिक चर्चेत आहे. बॉलिवूडमध्ये सर्वात टॉपचा अभिनेता म्हणून त्याला ओळखले जाते. रणवीर नेहमीच त्याच्या अभिनयासह कपड्यांमुळे आणि हटके स्टाईल चर्चेत असतो. मात्र सध्या तो एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आला आहे. ते म्हणजे रणवीर सिंगला NBA (National Basketball Association) अर्थातच नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनचा ब्रँड अँबॅसिडर बनवण्यात आले आहे. त्यामुळे रणवीरच्या मेहनतीला आणखी एक सुपरहिट हिरोची पावती मिळाली आहे. ब्रँड अँबॅसिडर पदासाठीची निवड त्याच्या करियरमधील एक सन्मानाची गोष्ट आहे.

रणवीर सिंगच्या विविध चित्रपटांतील दर्जेदार भूमिकांना प्रेक्षकांकडून नेहमीच पसंती मिळते, त्याच्या प्रत्येक भूमिकेची विशेष कौतुक केले जाते. चित्रपटांशिवाय रणवीर अनेक कंपन्यांच्या जाहिरातीचा चेहरा बनला आहे. तरुणांना रिलेट करणाऱ्या जाहिरांतींसाठी नेहमीच रणवीरला पसंती मिळते. रणवीर सिंगने ही आनंदाची बातमी त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केली आहे. रणवीरने एक फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, आपण पण आता नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनसोबत जोडला गेलो.

रणवीर सिंग NBA सोबत २०२१-२२च्या ऐतिहासिक ७५ व्या वर्षी बास्केटबॉल लीगचा विस्तार वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच रणवीर सिंगने पुढे म्हटले की, ‘मी NBA कुटुंबात सहभागी होण्यासाठी तसेच NBA चा ब्रँड अँबॅसिडर होण्यासाठी उत्सुक आहे. बास्केटबॉल एक असा खेळ आहे जो माझा बालपणापासूनचा आवडता खेळ आहे. बास्केटबॉल या खेळाची आपल्या देशातील लोकांमध्ये आवड निर्माण करण्याची संधी मिळणं हे खूपच सन्मानकारक आहे’. तसेच रणवीरने म्हटलं, ‘मला NBA च्या गेम्स खेळायलाही प्रचंड आवडतं. कारण यामध्ये लागणारं स्पिरिट आणि उत्साह रोमांचित आहे’. खेळाच्या मैदानात आणि बाहेरही खेळाडूंचा उत्साह अजब असतो. मला या सर्व खेळाडूंचं कौतुक आहे’.

रणवीर आत्ता क्लीव्हलँडमध्ये एनबीए ऑल-स्टार २०२२ मध्ये सहभागी होत पडद्यामागील सोशल मीडिया कंटेन्ट पोस्ट करेल आणि एनबीए खेळाडू आणि दिग्गजांना भेट देत मुलाखतसुद्धा घेणार आहे. रणवीर सिंग २०१६ मध्येही NBA च्या ऑल स्टार टोरँटो लीगमध्ये सहभागी झाला होता. रणवीर सिंगच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाल्यास, रणवीर लवकरचं ‘८३’ मध्ये झळकणार आहे. तसेच आगामी काळात रणवीर ‘रॉकी और राणी कि प्रेमकहाणी’, ‘जयेश भाई जोरदार’, ‘सर्कस’ आणि ‘सूर्यवंशी’ या चित्रपटात झळकणार आहे.