घरताज्या घडामोडीअनिल कपूरची मुलगी नसतीस तर कामवाली झाली असतीस; नेटकऱ्यांनी सोनमला झापले!

अनिल कपूरची मुलगी नसतीस तर कामवाली झाली असतीस; नेटकऱ्यांनी सोनमला झापले!

Subscribe

यामुळे बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर सोशल मीडियावर ट्रोल झाली.

यंदाचे २०२० वर्ष बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीसाठी जणू एकदम अनलकी ठरलं आहे. प्रत्येकासाठी हे वर्ष विसरणं अशक्य आहे. या वर्षात बॉलिवू़ड इंडस्ट्रीने अनेक उत्कृष्ट कलाकारांना गमावले आहे. इरफान खान, ऋषी कपूर, वाजिद खान यानंतर सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यूने सर्वांना हादरवलं आहे.

सुशांतने त्याच्या वांद्र येथील राहत्या घरी रविवारी गळफास लावून आत्महत्या केली. यानंतर बॉलिवूडच्या कलाकारांपासून ते राजकारणातील अनेक नेत्यांनी सोशल मीडियावर शोक व्यक्त केला. दरम्यान याबाबत बॉलिवूडची अभिनेत्री सोनम कपूरनेही एक ट्विट केलं होत. तिच्या या ट्विटमुळे ती सोशल मीडियावर चांगलीचं ट्रोल झाली.

- Advertisement -

- Advertisement -

सुशांतच्या मृत्यूनंतर तिने ट्विट केलं होत की, ‘एखाद्याच्या मृत्यूसाठी गर्लफ्रेंड, एक्स गर्लफ्रेंड, कुटुंब, सहकारी यांना दोष देणं अज्ञान आहे.’ सोनमच्या या ट्विटनंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलंच पण ज्ञान वाढवण्याचा सल्लाही दिला.

सुशांतच्या आत्महत्येच्या प्रकरणात महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुखे यांनी भाष्य केले आहे. गृहमंत्र्यांनी ट्विटरच्या माध्यमातून लिहिलं की, ‘सुशांतच्या पोस्टमार्टमच्या रिपोर्टनुसार त्यांने गळफास लावून आत्महत्या केली. तसेच त्याच्या शरीरात कोणतेही नशेचा पदार्थ आढळला नाही. त्याने नैराश्यामुळे हे पाऊल उचललं आहे. पण माध्यमाच्या रिपोर्टनुसार, त्याच्या व्यावसायिक कारणामुळे त्याच्यावर तणाव आला का? या दृष्टीकोनातून पोलिस तपास करणार आहेत.’


हेही वाचा – सुशांतच्या आत्महत्येनंतर अंकिता लोखंडेची झाली अशी अवस्था….


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -