घरमनोरंजनThe Kashmir Files : 'द कश्मीर फाईल्स'मधून जगासमोर येणार काश्मिरी पंडितांचा संघर्ष

The Kashmir Files : ‘द कश्मीर फाईल्स’मधून जगासमोर येणार काश्मिरी पंडितांचा संघर्ष

Subscribe

'द कश्मीर फाईल्स'चा ट्रेलर प्रदर्शित झाला असून यात 1990 मधील काश्मीर पंडितांचे दुःखद अनुभव दाखवण्यात आला आहे.

बहुचर्चित ‘द काश्मीर फाईल्स’ हा सिनेमा लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित या सिनेमाचा ट्रेलर आजच प्रदर्शित करण्यात आला आहे. 11 मार्च 2022 पासून हा सिनेमा प्रेक्षकांना बॉक्स ऑफिसवर पाहता येणार आहे. सत्य घटनेवर आधारित या चित्रपटात कश्मिरी पंडितांचे दुःख, पीडा आणि संघर्षाची गोष्ट दाखवली आहे. या बरोबरंच हा चित्रपट लोकतंत्र, धर्म, राजनीति आणि मानवतेवर आधारित आहे.


1990 च्या काळातील काश्मिरी पंडितांचा संघर्ष यात दाखवला असून 30 वर्षांपासून लपून असलेल्या काश्मीरी पंडितांची गोष्ट या चित्रपटाद्वारे जगासमोर येणार आहे. या चित्रपटात मिथुन चक्रवर्ती, अनु्पम खेर, पल्लवी जोशी, दर्शन कुमार, चिन्मय मांडलेकर हे कलाकर मुख्य भूमिकांमध्ये दिसणार आहेत.

- Advertisement -

गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती. पण आता हा सिनेमा 11 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘द कश्मीर फाईल्स’ चे दिग्दर्शन विवेक अग्निहोत्री यांनी केले असून झी स्टुडिओज, आय एम बुद्धा आणि अभिषेक अग्रवाल आर्ट्सच्या बॅनरखाली तेज नारायण अग्रवाल, अभिषेक अग्रवाल , पल्लवी जोशी यांची निर्मिती आहे.


‘बाबू’ शेठचा जलवा आता लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीस

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -