HomeमनोरंजनBollywood Upcoming Movies : फेब्रुवारी कोणाचा? 4 सिनेमे आमने सामने, 2 स्टारकिड्सची...

Bollywood Upcoming Movies : फेब्रुवारी कोणाचा? 4 सिनेमे आमने सामने, 2 स्टारकिड्सची ग्रँड लॉन्चिंग

Subscribe

वर्षातील नव्या महिन्याची सुरुवात झाल्यापासून आगामी सिनेमांबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढू लागली आहे. येत्या काही दिवसांत बॉलिवूडचे एकापेक्षा एक कमाल आणि मुख्य म्हणजे वेगवेगळ्या जॉनरचे सिनेमे प्रदर्शित होणार आहेत. प्रेक्षकांना कायमच वेगवेगळ्या विषयांवर आधारित सिनेमे पहायला आवडतात. त्यामुळे फेब्रुवारी महिना प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची पर्वणी ठरणार हे नक्की. या महिन्याच्या पहिल्याच दोन आठवड्यात बिग बजेट आणि मोठी स्टारकास्ट असणारे सिनेमे प्रदर्शित होत आहेत. ज्यात दोन स्टारकिड्सच्या सिनेमाचा देखील समावेश आहे. त्यामुळे हा महिना कुणाचे नशीब चमकवणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. चला तर हे 4 सिनेमे कोणते आहेत? याविषयी जाणून घेऊया. (Bollywood Upcoming Movies Release Clash In February)

1. लवयापा

फेब्रुवारीत रिलीज होणाऱ्या सिनेमांच्या यादीतील पहिले नाव आहे ‘लवयापा’. हा सिनेमा येत्या 7 फेब्रुवारी 2025 रोजी सर्वत्र थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन अद्वैत चंदनने केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Phantom Studios (@fuhsephantom)

या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमीर खानचा मुलगा जुनैद खान आणि बोनी कपूरची मुलगी खुशी कपूर सिल्वर स्क्रीन डेब्यू करणार आहेत. हे दोघेही स्टारकिड्स एकाच सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येत असले तरी स्पर्धेत टिकून राहणार का? याविषयीची उत्सुकता विशेष आहे.

2. बैडएस रविकुमार

‘लवयापा’ सिनेमाला टक्कर देण्यासाठी 7 फेब्रुवारी 2025 रोजी ‘बैडएस रविकुमार’ थिएटरमध्ये दाखल होतोय. हा एक जबरदस्त क्लॅश ठरणार आहे. हिमेश रेशमिया आणि प्रभुदेवाचा हा सिनेमा मनोरंजनाची एक लेव्हल अप करण्यासाठी येतोय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Himesh Reshammiya (@realhimesh)

या सिनेमातून हिमेश रेशमिया पुन्हा एकदा रोमँटिक अंदाजात दिसणार आहे. शिवाय त्याचा खतरनाक अंदाजही प्रेक्षकांना पहायला मिळेल. या सिनेमातून हिमेशने 2025 मध्ये 80s चा फील देण्याचा प्रयत्न केला आहे.

3. छावा

‘लवयापा’ आणि ‘बैडएस रविकुमार’च्या क्लॅशनंतर अगदी आठवड्याभरातच 14 फेब्रुवारी 2025 रोजी ‘छावा’ हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर बेतलेला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Maddock Films (@maddockfilms)

या सिनेमातील मध्यवर्ती भूमिका छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत अभिनेता विक्की कौशल तर महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत रश्मिका मंदाना दिसणार आहे. शिवाय या सिनेमात अक्षय खन्ना निगेटिव भूमिकेत दिसणार आहे. तो मुघल बादशाह औरंगजेबाची भूमिका साकारणार आहे.

4. नखरेवाली

जिओ स्टुडिओ आणि आनंद एल राय यांच्या कलर यलो प्रॉडक्शन्सचा ‘नखरेवाली’ हा सिनेमा मोठ्या पडद्यावर ‘छावा’ सिनेमाला टक्कर देणार आहे. राहुल शांकल्या दिग्दर्शित हा सिनेमा येत्या 14 फेब्रुवारी 2025 रोजी थिएटरमध्ये रिलीज होईल. या सिनेमाची निर्मिती ज्योती देशपांडे, आनंद एल राय आणि हिमांशू शर्मा यांनी केली आहे.

या सिनेमात अंश दुग्गल आणि प्रगती श्रीवास्तव मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. हा चित्रपट एक रोमँटिक ड्रामा असून अत्यंत रंजक पद्धतीने साकारण्यात आला आहे. माहितीनुसर, सत्य व्यास यांच्या ‘दिल्ली दरबार’ या पुस्तकावर हा सिनेमा आधारित आहे.

हेही पहा –

Prabhas : हर हर महादेव, कन्नप्पा सिनेमातील प्रभासचा फर्स्ट लूक रिलीज