घरमनोरंजनVidyut Jammwal IB 71 : विद्युत जामवालचा देशभक्तीवर आधारित IB 71 च्या...

Vidyut Jammwal IB 71 : विद्युत जामवालचा देशभक्तीवर आधारित IB 71 च्या शूटिंगचा श्रीगणेशा

Subscribe

बॉलिवूडचा अॅक्शन सुपरस्टार विद्युत जामवाल  ‘अॅक्शन हिरो फिल्म्स’ प्रोडक्शन हाऊस सुरु करुन आता निर्माता झाला आहे. यामार्फत विद्युत आपला पहिला स्पाय थ्रिलर चित्रपट ‘IB 71’ प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते, चित्रपट निर्माते संकल्प रेड्डीसोबत हा चित्रपट बनला जात आहे. विद्युत याने चित्रपटाच्या शुटिंगचा श्रीगणेशा मुंबईतून केला असून यातून एक अप्रतिम कथा प्रेक्षकांना दाखवली जाणार आहे. निर्माता म्हणून विद्युतसाठी ही एक नवीन सुरुवात असून त्याचा पहिला चित्रपट शूटिंगच्या फ्लोरवर आला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vidyut Jammwal (@mevidyutjammwal)

- Advertisement -

एका सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट असून अभिनेता विद्युत जामवाल एका गुप्तचर अधिकाऱ्याची भूमिका साकारणार  आहे. भारतीय गुप्तचर अधिकारी कसे संपूर्ण पाकिस्तानी कार्यालयाला चकमा देत आपल्या सशस्त्र दलांना दोन आघाड्यांवर युद्धाला सामोरे जाण्यास कशी आवश्यक मदत पुरवतात. याचे चित्रण करण्यात आले आहे. या सशक्त चित्रपटाचे नेतृत्व संकल्प रेड्डी यांनी केले आहे, ज्यांनी ‘गाझी’ चित्रपटाचा संवेदनशील विषय अतिशय उत्तमरित्या हाताळला होता.

या चित्रपटात विद्युत जामवाल मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाची कथा आदित्य शास्त्री यांनी लिहिली असून पटकथा ‘स्टोरीहाऊस फिल्म्स एलएलपी’ने तयार केली आहे. चित्रपटाबद्दल बोलताना निर्माता-अभिनेता विद्युत जामवाल म्हणाला की, “माझे प्रोडक्शन हाऊस ‘ऍक्शन हिरो फिल्म्स’ ची ही एक नवीन सुरुवात आहे. इतिहासातील गौरवशाली अध्याय पुन्हा सांगणाऱ्या चित्रपटाचे समर्थन करताना मला आनंद होत आहे. ही गुप्तचर अधिकाऱ्यांच्या प्रतिभेची गोष्ट आहे, ज्यांना मी मनापासून सलाम करतो. मी आणि माझी टीम कृतज्ञ आहोत की आम्ही या वर्षाची सुरुवात रोमांचकारी पद्धतीने करत आहोत. ‘IB 71’ हा चित्रपट गुलशन कुमार, T-Series Films आणि Reliance Entertainment यांच्या सहयोगाने प्रस्तुत होणार आहे.


‘Pushpa’ सिनेमाचे हिंदी व्हर्जन पाहिलात का? इथे झालाय रिलीज


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -