Sunday, April 11, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन बडे दिलवाला! विद्युतने फोटोग्राफरला दिले ४० हजार रुपयांचे जॅकेट

बडे दिलवाला! विद्युतने फोटोग्राफरला दिले ४० हजार रुपयांचे जॅकेट

Related Story

- Advertisement -

विद्युत जामवाल हा बॉलिवूडचा पावरपॅक एॅक्शन हिरो म्हणून सुपरहिट आहे. आपल्या दमदार अॅक्शनबरोबरच तो दिलदार कलाकार आहे हे फार कमी जणांना ठाऊक असेल. सध्या सोशल मीडियावर विद्युत जामवालचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तो बाईकवर बसून निघत असतो. यादरम्यान तो डोक्‍यावर हेल्मेट घालत असतानाच एक फोटोग्राफर त्याच्या जवळ येतो आणि त्याची चौकशी करतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

- Advertisement -

एवढेच नव्हे तर तो फोटोग्राफर विद्युतच्या जॅकेटचे कौतुक करत असतो. हे ऐकताच विद्युत बाईक पुढे न नेता थांबतो आणि खांद्यावरील बॅग उतरवतो. क्षणाचाही विलंब न करता तो आपले महागडे जॅकेट त्या फोटोग्राफरला काढून देतो. याचा एक व्हिडीओ त्या फोटोग्राफरने सोशल मीडियावर शेअर केले असून यातून विद्युतच्या दिलदारी चाहत्यांसमोर येत आहे.

विद्युतने फोटोग्राफरला दिलेले ते जॅकेट स्पेशल कन्डिशन्ड असून त्याची किंमत तब्बल 40 हजार रुपये इतकी आहे. जॅकेट काढल्यावर विद्युत जमवालची पावरफूल बॉडीही चाहत्यांनी दिसली. विद्युत जमवालने ‘कमांडो’ सिरीजमधून आपली धमाकेदार अॅक्शन दाखवली. याशिवाय ‘बुलेट राजा’ आणि ‘जंगल’सारख्या सिनेमांमधूनही त्याने ऍक्‍शन रोल केले आहेत. ‘द पॉवर’ मध्ये विद्युत जमवाल आणि श्रेया हासन देखील दिसले होते.


- Advertisement -

 

- Advertisement -