‘विक्रम वेधा’चे दुसरे गाणे ‘बंदे’ रिलीज, पाहा गाण्यातील ह्रतिक रोशनचा धमाकेदार अंदाज

bollywood vikram vedha second song bande released hrithik roshan style will win hearts

हृतिक रोशन आणि सैफ अली खान अभिनित विक्रम वेधा शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर रिलीज होणार आहे. मात्र रिलीज पूर्वीच चित्रपटाला खूप प्रेम मिळत असून त्याची क्रेझ वाढत आहे. या चित्रपटात अभिनेता ह्रतिक रोशन एका कुख्यात गँगस्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. तर सैफ अली खान एका एन्काउंटर स्पेशालिस्ट अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटातील ‘अल्कोहोलिया’ या पहिल्या गाण्याने इंटरनेटवर धुमाकूळ घातल्यानंतर दुसरे गाणे ‘बंदे’ घेऊन प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहे.

विक्रम वेधाचे हे गाणे प्रेक्षकांना गुंड आणि पोलिसांच्या दुनियेत खोलवर घेऊन जाते. वेधा एक भयंकर गुंड म्हणून इलेक्ट्रीफायिंग कॉपमध्ये विक्रमच्या भूमिकेत त्याच्या कर्तव्यासाठी सर्व मर्याद्या पार केल्या. आता निर्माते चित्रपटातील नवे ‘बंदे’ हे गाणे घेऊन आले असून हे गाणे श्रोत्यांना विक्रम वेधाच्या दुनियेत घेऊन जाईल, जिथे विक्रमचा सुपर कूल स्वॅग एक पोलीस म्हणून आणि ग्रे गँगस्टर वेधा वेड लावेल. हे गाणे SAM CS द्वारे संगीतबद्ध आणि प्रोग्राम केले असून, शिवमने गायले आहे आणि मनोज मुनताशीर यांनी गीते लिहिली आहेत. विक्रम वेधाच्या गाण्यामध्ये संवाद देखील ऐकायला मिळत आहेत, जे लोकांना खूप आवडले आहेत.

जशी जशी चित्रपट प्रदर्शित होण्याची तारीख जवळ येत आहे तसतशी प्रेक्षकांमध्ये त्याची क्रेझही वाढत आहे. हे पाहता चित्रपटाची आगाऊ बुकिंग विंडो 24 सप्टेंबरपासून देश-विदेशातील 1250 मल्टिप्लेक्समध्ये प्रेक्षकांसाठी खुली करण्यात आली आहे.

विक्रम वेधा हे गुलशन कुमार, टी-सीरीज आणि रिलायन्स एंटरटेनमेंट यांनी फ्रायडे फिल्मवर्क्स आणि जिओ स्टुडिओ आणि YNOT स्टुडिओ प्रॉडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने सादर केले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन पुष्कर आणि गायत्री यांनी केले असून भूषण कुमार आणि एस शशिकांत यांनी निर्मिती केली आहे. हा चित्रपट 30 सप्टेंबर 2022 रोजी जागतिक स्तरावर मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.

हा चित्रपट साऊथचा सुपरहिट चित्रपट विक्रम वेधाचा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटात ह्रतिक रोशन साऊथचा सुपरस्टार विजय सेतुपती यांने वठवलेल्या एक दुष्ट गुन्हेगाराची भूमिका साकारत आहे. तर सैफ अली खान, आर. माधवन एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. जो प्रत्येक वेळी गुन्हेगाराने सांगितलेल्या कथेत अडकतो आणि त्याला पकडू शकत नाही. त्याचबरोबर या चित्रपटात अभिनेत्री राधिका आपटे एका वकिलाच्या भूमिकेत दिसणार आहे, जी आपल्या क्लायंटला वाचवण्यासाठी लढताना दिसणार आहे.


 

इंटरनेटचा वेग आता चारपटीने वाढणार; घरबसल्या डाऊनलोड करू शकता HD क्वॉलिटी फिल्म