२०२३ पर्यंत कंगाल होईल बॉलिवूड, तनुश्री दत्ताच्या पोस्टने खळबळ

तनुश्री दत्ताने काही वेळापूर्वीच आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक लांब पोस्ट लिहून शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने बॉलिवूड आणि इंडस्ट्रीशी जोडलेल्या लोकांबद्दल आश्चर्यकारक भविष्यवाणी केली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ता नेहमी सोशल मीडियावर चर्चेत असते. बऱ्याच दिवसांपासून तनुश्री दत्ता प्रसिद्धीपासून दूर आहे, परंतु ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. २०१८ मध्ये तनुश्री दत्ताने #मीटू ची सुरुवात केली होती. तसेच यावेळी तिने अनेक धक्कादायक खुलासे सुद्धा केले होते. त्यावेळी तनुश्री दत्ताने प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक छळ केल्याचा आरोप केला होता. तेव्हापासून ती वारंवार बॉलिवूडच्या विरोधात बोलताना दिसत आहे. दरम्यान, तनुश्री दत्ताने पुन्हा एकदा बॉलिवूडवर निशाणा साधला आहे.

तनुश्री दत्ताने काही वेळापूर्वीच आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक लांब पोस्ट लिहून शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने बॉलिवूड आणि इंडस्ट्रीशी जोडलेल्या लोकांबद्दल आश्चर्यकारक भविष्यवाणी केली आहे. या पोस्टमध्ये तनुश्री दत्ताने लिहिलंय की, “बॉलिवूडसाठी माझी भविष्यवाणी आहे की ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत फायनान्सर बॉलिवूड चित्रपट आणि प्रकल्पांना निधी देणं बंद करतील. तसेच अनेक मोठे प्रोडक्शन हाऊस आणि कलाकार एप्रिल २०२३ पर्यंत दिवाळखोर होतील. मृत्यू झालेल्या लोकांच्या यादीत अनेक धक्कादायक नावांचा समावेश असेल.”

तनुश्री दत्ताने पुढे लिहिलंय की, “ओटीटीवर येणाऱ्या चित्रपटांसाठी देखील खूप कमी प्रेक्षक मिळतील. लोक आता जगभरातील कटेंट जास्त पाहतील, जो हिंदी किंवा दुसऱ्या भाषेत डब केलेला असेल. साउथचे चित्रपट सुद्धा अनेकजण पाहतील, मात्र त्यासाठी त्यांना थोडा संघर्ष करावा लागेल. साउथचे कलाकार बॉलिवूडवर येणाऱ्या प्रतीक्रियांमुळे बॉलिवूड सोडून देतील. लोक बॉलिवूड आणि बॉलिवूडमधील कलाकारांच्या विरोधी असतील. जेव्हा ही वेळ येईल. तेव्हा मी हे सगळं सांगितलं आणि लिहिलं आहे, ते लक्षात ठेवा.”


हेही वाचा :आलियाच्या ‘डार्लिंग्स’वर प्रेक्षक संतापले, चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी