‘Dance India Dance Supermoms 3’ मध्ये भाग्यश्रीसोबत बॉलिवूडच्या ‘या’ दिग्गज अभिनेत्रीचा असणार सहभाग

टेलिव्हिजनवर येत्या काळात बरेच रियालिटी शो प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. या यादीमध्ये ‘खतरों के खिलाड़ी 12’, ‘बिग बॉस 16’, ‘झलक दिखला जा’ आणि ‘इंडियन आइडल 13’ यांसारख्या लोकप्रिय कार्यक्रमांचा सहभाग आहे. याच दरम्यान आता लवकरच टेलिव्हिजनवरील सुपरहिट कार्यक्रम ‘डांस इंडिया डांस सुपरमॉम’ सुरू होणार असल्याची बातमी समोर येत आहे. सध्या या रियालिटी शोचे ऑडिशन सर्वत्र सुरू झाले असून ‘डांस इंडिया डांस सुपरमॉम 3’चे सूत्रसंचालन हिंदी टेलिव्हिजन अभिनेता जय भानुशाली होस्ट करणार आहे. तसेच ‘डांस इंडिया डांस सुपरमॉम 3’ चे जज म्हणून या दोन दिग्गज बॉलिवूड अभिनेत्रींची निवड करण्यात आली आहे.

‘डांस इंडिया डांस सुपरमॉम 3’ला जज करणार ही बॉलिवूड अभिनेत्री


सूत्रांच्या माहितीनुसार, बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर ‘डांस इंडिया डांस सुपरमॉम 3’ची जज बनणार आहे. ‘डांस इंडिया डांस सुपरमॉम 3’च्या माध्यमातून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर बऱ्याच काळानंतर टेलिव्हिजनवर परतनार आहे. याआधा उर्मिलाने मराठी टेलिव्हिजवरील ‘डांस महाराष्ट्र डांस’ या रियालिटी शो ची जज झाली होती. उर्मिला मातोंडकर पहिल्यांदाच एका हिंदी रियालिटी शोची जज होणार आहे.

मागील काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्री सुद्धा ‘डांस इंडिया डांस सुपरमॉम 3’ची जज होणार असल्याची बातमी समोर आली होती. काही दिवसांपूर्वी भाग्यश्रीने तिच्या पती सोबत ‘स्मार्ट जोडी’मध्ये सहभागी झाली होती. आता येत्या काळात भाग्यश्री, उर्मिला मातोंडकर सोबत ‘डांस इंडिया डांस सुपरमॉम 3’चे जज करणार आहे.

 


हेही वाचा :http://Khatron Ke Khiladi 12 : ‘खतरों के खिलाड़ी 12’मध्ये अक्षय कुमारची कडक एन्ट्री