घरमनोरंजनVideo: बोमन इराणीने 'या' अभिनेत्रीबरोबर केला रिक्षातून प्रवास

Video: बोमन इराणीने ‘या’ अभिनेत्रीबरोबर केला रिक्षातून प्रवास

Subscribe

बोमन इराणी यांनी नुकताच एक व्हीडीओ सोशलमिडीयावर शेअर केला आहे. हा व्हीडीओ तुफा व्हायरल होत आहे.

अभिनेता बोमन इराणी यांनी आपल्या अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या मनात आदराचं स्थान निर्माण केलं आहे. त्यांची प्रत्येक भुमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहते. ३ इडियट्स मध्ये वायरस ची भुमिका असो की डॉ. अस्थाना या भुमिका प्रेक्षकांच्या अगदी तोंडपाठ आहेत. पण प्रत्यक्षात बोमन इराणी माणूस म्हणून किती चांगले आहेत, मोठा कलाकार असून देखील त्यांचे पाय अद्याप जमीनीवर आहेत याचा प्रत्यय सगळ्यांना आलाय. बोमन इराणी यांनी नुकताच एक व्हीडीओ सोशलमिडीयावर शेअर केला आहे.

- Advertisement -

काय आहे व्हीडीओत

बोमन आपल्या गाडीमधून प्रवास करत असताना बाजूने एक महिला रिक्षाचालक जात असते. बोमन त्या महिलेला शुभेच्छा देत असतात. रिक्षाचालक महिला बोमन यांना तिच्या सोबत फोटो काढण्यासाठी विनंती करते. बोमन आपल्या चाहत्यांनी कधीच नाराज करत नाहीत. ते आपल्या वाहनामधून उतरुन त्या महिलेसोबत फोटो काढतात.
त्यानंतर रिक्षाचालक महिलेचे नाव लक्ष्मी असल्याचे बोमन सांगतात. तसेच दिवसा मराठी मालिकांमध्ये काम करते आणि रात्री रिक्षाचालकाचे काम करते असे त्यांनी व्हिडिओमध्ये म्हटलं आहे. ही महिला सर्वांसाठीच एक प्रेरणा ठरु शकते असे ते पुढे म्हणतात. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

बोमन यांनी आपल्या गाडीतून उतरून रिक्षेत एगदी निसंकोचपणे लक्ष्मीच्या बाजूला बसले. यावेळी त्यांनी खूप गप्पा मारल्या. त्यांनी लक्ष्मीचं खूप कौतूकही केलं. या सगळ्या प्रसंगामूळे लक्ष्मीपण खूप भारावून गेली होती. या प्रसंगामुळे बोमन कलाकार म्हणून जितके चांगले आहेत तितकेच माणूस म्हणूनही उत्तम असल्याचा प्रत्यय सगळ्यांना आला.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -