अमिताभ बच्चन, मुकेश अंबानी आणि धर्मेंद्र यांच्या बंगल्याला बॉम्बने उडवण्याची धमकी

मंगळवारी एका अज्ञान व्यक्तीने नागपूर पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करुन बॉलिवूडमधील दोन दिग्गज कलाकारांच्या घरामध्ये बॉम्ब ठेवल्याचा दावा केला. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत. मुंबई पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, मंगळवारी नागपूर पोलीस नियंत्रण कक्षाला एक अज्ञात फोन आला होता. ज्यामध्ये एका अज्ञात व्यक्तीने बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन, उद्योगपती मुकेश अंबानी आणि धर्मेंद्र यांच्या घरात बॉम्ब ठेवल्याचा दावा केला आहे. ही बातमी कळताच सगळीकडे गोंधळ उडाला नागपूर पोलीसांना ही बातमी कळताच त्यांनी तात्काळ मुंबई पोलीसांनी अमिताभ, धर्मेंद्र यांच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली. शिवाय याप्रकरणाचा तपास देखील सुरु केला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

मंगळवारी नागपूर पोलीसांना एक अज्ञात फोन आला होता. याचं फोन कॉलमुळे नागपूरसह मुंबई पोलिस देखील सावध झाले. या फोन कॉलवरील व्यक्तीने दावा केला की, तो अमिताभ बच्चन, मुकेश अंबानी आणि धर्मेंद्रच्या बंगल्याला बॉम्बने उडवणार आहे. इतकंच नव्हे तर, त्या व्यक्तीने दावा केलाय की, दहशतवादी हल्ला करण्यासाठी 25 दहशतवादी मुंबईत पोहोचल्याचा दावा देखील त्या व्यक्तीने केला.

दरम्यान, या फोन कॉलनंतर तातडीने कारवाई करण्यात आली आहे. ही माहिती मिळताच पोलीसांनी बॉम्ब निकामी पथक घटनास्थळी रवाना झाले आहेत. शिवाय त्या अज्ञात व्यक्तीचा देखील शोध सुरु करण्यात आला आहे.

 


हेही वाचा : 

गुरमीत-देबिनाची श्रीलंका ट्रीप पडली महागात; झाली इन्फ्लूएंजा बी विषाणूची लागण