घरताज्या घडामोडीSushant Suicide Case: रियाला एका महिन्यानंतर मिळाला जामीन

Sushant Suicide Case: रियाला एका महिन्यानंतर मिळाला जामीन

Subscribe

ड्रग्ज प्रकरणात अटकेत असलेल्या अभिनेत्री रिया चक्रवर्तीला हिला हायकोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. सुशांतसिंह एनसीबी ड्रग्ज प्रकरणात रिया चक्रवर्तीचा अखेर जामीन मंजूर करण्यात आला आहे. रियासह सुशांतचे कर्मचारी सॅम्यूल मिरांडा आणि दिपेश सावंत यांचाही जामीन मंजूर करण्यात आला आहे. पण हायकोर्टाने रियाचा भाऊ शौविक यांचा जामीन फेटाळला आहे.

सुशांतसिंह ड्रग्ज प्रकरणी रिया चक्रवर्तीला एनसीबीकडून अटक करण्यात आली आहे. पण आता रिया जवळपास एका महिन्यानंतर रिया जेलबाहेर पडणार आहे. रियाच्या जामीन याचिका आज मुंबई हायकोर्टाने स्वीकारली आहे. यासाठी १ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर तिची सुटका करण्याचे आदेश देण्यात आले आहे. तसेच तिला तिचा पासपोर्ट एनसीबीकडे जमा करावा लागणार आहे. शिवाय तिला तपास यंत्रणेच्या परवानगी शिवाय मुंबई बाहेर जाता येणार नाही आहे. मुंबई बाहेर जायचे असेल तर तिला तपास अधिकाऱ्याला कळवावं लागले. दरम्यान रिया सुटका झाल्यानंतर दर १० दिवसांनी पोलीस स्टेशनमध्ये हजेरी नोंदवावी लागणार आहे. दरम्यान मुंबई हायकोर्टाने रियाचा जामीन मंजूर केला असला तरी रियाचा भाऊ शौविक याच्यासह अब्दुल बसितचा जामीन अर्ज फेटाळला आहे.

- Advertisement -

८ सप्टेंबरला सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी म्हणून रिया हिला ड्रग्ज सेवनासह अन्य आरोपांखाली अटक करण्यात आली होती. सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच ड्रग्ज तस्करीचे प्रकरण समोर आले. याप्रकरणी चौकशी दरम्यान रियाचे नाव समोर आले होते. तिच्या चौकशीच्या तिसऱ्या दिवशी तिला अटक करण्यात आली. सुशांतचा कर्मचारी दीपेश सावंतच्या चौकशीदरम्यान रियाचे नाव पुढे आले. मग यानंतर रियाला चौकशीसाठी एनसीबीने समन्स बजावला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -