घरमनोरंजनपत्रकार धमकी प्रकरणी Salman Khan ला दिलासा; अंधेरी दंडाधिकारी कोर्टाच्या समन्सला 5...

पत्रकार धमकी प्रकरणी Salman Khan ला दिलासा; अंधेरी दंडाधिकारी कोर्टाच्या समन्सला 5 मेपर्यंत स्थगिती

Subscribe

एका पत्रकाराला धमकावल्याप्रकरणी प्रकरणी बॉलिवूड अभिनेता सलमान खान याला हायकोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. उच्च न्यायालयाने अंधेरी दंडाधिकारी कोर्टाच्या समन्सला 5 मेपर्यंत स्थगिती दिली आहे. तसेच आजच्या (5 एप्रिल) अंधेरी कोर्टातील हजेरीबाबत सलमानला सूट देण्यात आली आहे, त्यामुळे सलमानला कोर्टात हजर राहण्याची आवश्यकता नसल्याचे हायकोर्टाने स्पष्ट केले आहे.

2019 मध्ये एका पत्रकाराला धमकावल्याप्रकरणी मुंबईतील अंधोरी दंडाधिकारी न्यायालयाने सलमान खानला समन्स जारी केला होता. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी हजर राहण्यासाठी 5 एप्रिल रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश होते. समन्समध्ये सलमान खानसह त्याचा बॉडीगार्ड नवाज शेखलाही न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले होते.

- Advertisement -

दरम्यान सलमानचा बॉडीगार्डने एका पादचाऱ्यावर हल्ला करत त्याला धमकावल्याप्रकरणी अंधेरीतील डीएन नगर पोलीस ठाण्यात दाखल एफआयआर रद्द करण्याच्या मागणीसाठी सलमान खानने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.

नेमक प्रकरण काय?

काही वर्षांपूर्वी मुंबईतील रस्त्यावर सायकल चालवत असताना काही लोकांनी त्याचे फोटो काढण्याचा प्रयत्न केला, यावेळी सलमानच्या बॉडीगार्डने त्यांचा मोबाईल हिसकावून घेतला. तसेच सलमानच्या बॉडीगार्डने वाद घालत धमकी दिल्याचा आरोप पत्रकार अशोक पांडे यांनी केला. पांडे यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर सलमान खानच्या बॉडीगार्डविरोधात भादंवि कलम 504 (शांतता भंग करण्याच्या हेतूने हेतुपुरस्सर अपमान), 506 (धमकावणे), 323 (एखाद्याला इजा करणे), 392 (दरोडा), 506 (गुन्हेगारी प्रवृत्ती), 34 (एकापेक्षा अधिक व्यक्तींचा समान हेतू) या कलमांतर्गत डीएननगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाची सुनावणी महानगर दंडाधिकारी आर आर खान यांच्यासमोर पार पडली. दरम्यान रेकॉर्डवरील साहित्य, पोलिसांचा अहवाल, इतर पुरावे लक्षात घेऊन न्यायालयाने आरोपींना समन्स जारी केला.


अनेक अभिनेत्रींना फसवणाऱ्या तिहार तुरुंगातील आरोपी Sukesh Chandrasekhar ला ईडीकडून अटक


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -