बॉलिवूडची प्रसिद्ध दिग्दर्शिका आणि कोरिओग्राफर फराह खान सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. व्लॉग्सच्या माध्यमातून ती नेटकऱ्यांशी कनेक्ट राहते. नुकताच तिने बोनी कपूर आणि त्यांची मुलगी खुशी कपूरसोबत संवाद साधला. यावेळी तिने बोनी कपूर यांच्याविषयीचा एक खास किस्सा त्यांच्या लेकीला सांगितला आहे. हा किस्सा एका सिनेमातील गाण्याच्या शूटिंगदरम्यानचा आहे. जेव्हा बोनी कपूर यांनी हेलिकॉप्टरचा एखाद्या रिक्षासारखा वापर केला होता. याविषयी अधिक जाणून घेऊया. (Boney Kapoor used helicopter like rickshaw said by farah khan)
काय म्हणाली फराह खान?
फराह खानने अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित यांच्या ‘पुकार’ सिनेमाच्या शूटिंग दरम्यान घडलेला एक किस्सा बोनी कपूर यांच्या लेकीला सांगितला. त्या सिनेमातील एका गाण्याच्या शूटिंगवेळी बोनी कपूर यांनी एखाद्या रिक्षासारखा आणि डंझो डिलिव्हरी ॲपसारखा हेलिकॉप्टरचा वापर केल्याने तिने म्हटले. या सिनेमातील ‘किस्मत से तुम’ या गाण्याच्या शुटिंगसाठी सर्व कलाकार आणि क्रू अलास्काला गेले होते. त्यावेळी बोनी कपूर यांनी शूटिंग लोकेशनपर्यंत जाण्यासाठी तब्बल 10 हेलिकॉप्टरची व्यवस्था केली होती. फराहने खुशीला सांगितले, ‘तुझे वडील हेलिकॉप्टरचा वापर रिक्षा असल्यासारखे करत होते’.
अलास्कात बनवले बटर चिकन, नान, बिर्याणी,
फराहने या सिनेमाची आणखी आठवण सांगितली आहे. ती म्हणाली, ‘त्यावेळी दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांना केवळ इंडियन फूड खाण्याची ईच्छा होती. त्यावेळी बोनीला कसाबसा एक भारतीय स्वयंपाकी सापडला. आम्ही अलास्काच्या एका कोपऱ्यात होतो. जे उत्तर ध्रुवात आहे आणि अशा ठिकाणी बोनीने बटर चिकन, नान, बिर्याणी, पनीर आणि दाल मखनीची व्यवस्था केली होती. मी विचारत पडलेली की नेमकं होतंय तरी काय? त्यांना काही भारतीय स्वयंपाकी सापडले आणि ते या सगळ्यांना हेलिकॉप्टरच्या माध्यमातून घेऊन आले’.
हेही पहा –
Shivali Parab : शिवाली हे खरंय? असा सुरु झाला कल्याणच्या चुलबुलीचा हास्यजत्रेतला प्रवास