घरठाणेडोंबिवलीत पुस्तक आदान प्रदान सोहळा

डोंबिवलीत पुस्तक आदान प्रदान सोहळा

Subscribe

डोंबिवली । डोंबिवलीतील पै फ्रेंड्स लायब्ररीच्या माध्यमातून २० ते २९ जानेवारी दरम्यान पुस्तक आदान प्रदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सावळाराम महाराज क्रीडा संकुलातील बंदिस्त क्रीडांगणात होणार्‍या या कार्यक्रमात सुमारे दोन लाख पुस्तकांचे आदान प्रदान होणार असल्याचा विश्वास आयोजक पुंडलिक पै यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे. ज्या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे. त्या कार्यक्रम स्थळाचे ए.पी.जे.अब्दुल कलाम नगरी असे नामकरण करण्यात येणार असून त्यामध्ये पुस्तकांचा वापर करून इग्लू ,पिरॅमिड आणि अन्य कलाकृती साकारण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाच्या शुभारंभाला प्रख्यात साहित्यिक अच्युत गोडबोले,उमा कुलकर्णी, डॉ. उदय निरगुडकर, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, खासदार श्रीकांत शिंदे ,आमदार राजू पाटील, केडीएमसी आयुक्त मंगेश चितळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने शहरातील ३० हून अधिक शाळांच्या माध्यमातून १५ ते १९ जानेवारी दरम्यान ग्रंथ दिंडी काढण्यात येणार आहे. या ग्रंथ दिंडीमध्ये सुमारे १५ हजार विद्यार्थी सहभागी होणार आहेत. तसेच पै फ्रेंड्स लायब्ररीच्या माध्यमातून १९ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता इंदिरा गांधी चौक ते चार रस्ता,टिळक चौक,सर्वेश हॉल मार्गे गणेश मंदिर पर्यंत गंथ दिंडी काढण्यात येणार आहे.

- Advertisement -

दहा दिवसात अनेक मान्यवर या कार्यक्रमाला हजेरी लावणार असून त्यामध्ये माजी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन,महेश कोठारे, प्रणव सखदेव,अरुणा ढेरे,प्रल्हाद पै,वसंत लिमये,चंद्रशेखर टिळक,रोहन चंपानेरकर,श्रीकांत बोजेवार,अतुल कुलकर्णी,अशोक कोठावळे, सुदेश हिंगलासपुरकर, दिनकर गांगल, कुमार केतकर,अरुण शेवते,अक्षय बर्दापूरकर, कमलेश सुतार, प्रसाद मिराजदार, प्रभू कापसे,वैद्य परीक्षित शेवडे आदींचा समावेश आहे. तसेच या कार्यक्रमास राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ लेखिका सुधा मूर्ती आदींनी शुभेच्छा दिल्याची माहिती पुंडलिक पै यांनी दिली. या वेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, केडीएमसी कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे,विंदा भुस्कुटे,दिपाली काळे,दर्शना सामंत, प्रवीण दुधे आदी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -