घरमनोरंजनतुम्ही दोघं नाटकी... दीपिका-रणवीरचा नवा फोटो पाहून युझर्सने केलं ट्रोल

तुम्ही दोघं नाटकी… दीपिका-रणवीरचा नवा फोटो पाहून युझर्सने केलं ट्रोल

Subscribe

12 नोव्हेंबर रोजी संपूर्ण देशभरात दिवाळी सण साजरा करण्यात आला. बॉलिवूड कलाकारांचे देखील सध्या सोशल मीडियावर अनेक फोटो व्हायरल होत आहेत. बॉलिवूड अभिनेत्री दीपिकाने देखील तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर दिवाळीचे काही फोटो शेअर केले आहेत.

खंर तर, मागील काही दिवसांपूर्वी दीपिकाच्या लग्नाआधीच्या अफेअर्सची सोशल मीडियावर चर्चा रंगली होती. ज्यावरुन अनेकांनी दीपिकाला ट्रोल देखील केलं होतं.‘कॉफी विथ करण 8’ मधील दीपिका आणि रणवीरचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यावरुन दोघांमध्ये दुरावा आला असावा असं अनेकांचे मत होते. मात्र, नुकत्याच शेअर केल्या फोटोंवरुन सर्व काही ठीक असल्याचं दिसत आहे.

दीपिका-रणवीरने आनंदात साजरी केली दिवाळी

- Advertisement -

दीपिकाने शेअर केलेल्या फोटोमध्ये पहिल्या फोटोत दीपिका, रणवीरला किस करताना दिसताना दिसत आहे. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या फोटोमध्ये दीपिका आणि रणवीर हवन करताना दिसत आहेत. मात्र, दीपिका आणि रणवीरच्या या फोटोला अनेकजण कमेंट्स करत ट्रोल करत आहेत.

लग्नाआधीच्या अफेअर्समुळे दीपिका झाली ट्रोल

नुकत्याच काही दिवसांपूर्वी सुरु झालेल्या करण जौहरच्या ‘कॉफी विथ करण 8’ मध्ये दीपिका आणि रणवीर पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी रणवीर-दीपिकाने करणला रिलेशनशिपबद्दलचे अनेक किस्से सांगितले. यावेळी दीपिकाने खुलासा केला की, रणवीरसोबतच्या रिलेशनशिमध्ये असताना सुरुवातीच्या काळात ती इतर मुलांना देखील डेट करत होती. कारण ती त्यावेळी रणवीरबद्दल फारशी सिरीयस नव्हती. मात्र, त्यानंतर हळूहळू रणवीरबद्दल प्रेम वाटू लागले.

- Advertisement -

 


हेही वाचा :

अशी सापडली ‘नाळ भाग २’मधील चिमी !

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -